इन्स्टाग्राम वापल्याप्रकरणी आपल्यास ६ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार असल्याचा खळबळजनक दावा एका रशियन तरुणीने केला आहे. वेरोनिका लोगिनोव्हा असे या तरुणीचे नाव आहे. वेरोनिका ही फॅशन इन्फ्लुएन्सर आहे. या कारवाईने स्तब्ध झालेल्या वेरोनिकाने ही माहिती सोशल

माध्यमांवर जाहीर केली.

माध्यांतील अहवालांनुसार, वेरोनिकाने केवळ फॅशन आणि सौंदर्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर केला होता, तरी देखील तिच्यावर अतिरेकी कारवायांचा आरोप करत तिच्यावर कारवाई करण्यात आली. वेरोनिकाचे ५ लाख ५० हजारांपेक्षाही अधिक फॉलोवर्स आङे. तिच्यावर झालेल्या कारवाईची चर्चा सर्वत्र होत आहे.

(Viral : फाल्गुनी यांच्या ‘या’ गाण्याच्या रिमेकवर नेटकरी जाम संतापले, नेहाला म्हणाले गाणे बिघडवण्यासाठी तुला..)

रशियन डिजिटल राइट्स एनजीओ रॉस्कोमवोबोडा यांच्या मते, युक्रेनच्या युद्धानंतर मार्च महिन्यात अतरिकी कारवाईचा ठपका ठेवत रशियाच्या एका न्यायालयाने फेसबुक इन्स्टाग्रामवर बंदी घातली होती. त्यानंतर वेरोनिका या पहिल्या व्यक्ती आहे ज्यांच्यावर कारवाई झाली आहे.

वेरोनिकाने व्यक्त केला संताप

वेरोनिका यांनी इन्स्टाग्रावर रशियन भाषेत आपले मत व्यक्त केले आहे. यात आता केवळ इन्स्टाग्राम वापरण्यासाठी मला ६ वर्षांचा तुरुंगवास देण्यात आला आहे. या विषयी बोलण्याची आमच्यात प्रथा नाही, मात्र मी बोलणार अशा ठाम विश्वासाह वेरोनिकाने आपला संताप व्यक्त केला.

पॅरिसमध्ये असताना मिळाली माहिती

कारवाई करण्यात आली तेव्हा वेरोनिका ही पॅरिसमध्ये होती. तिला तिच्या आईकडून फोन आला होता. वेरोनिकाने सांगितले की, १७ ऑग्सटला पॅरिसमध्ये असताना मला माझ्या आईचा फोन आला. ती म्हणाली पोलीस तुला शोधत आहे. यावेळी दोन व्यक्ती हातात एका निवेदनासह दारात उभे होते, यात इन्स्टाग्राम वापरल्याप्रकरणी मला ६ वर्षांचा तुरुंगवास देण्यात आला होता. तसेच त्यात तुम्ही अतिपणा करत असल्याचे म्हटले आहे.

काय आहेत आरोप?

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल माध्यमांच्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी कृती करणे, असा आरोप वेरोनिकावर करण्यात आला आहे. यासंबंधी कागदपत्रेदेखील वेरोनिकाने इन्स्टाग्रावर शेअर केली आहेत.