पाळीव प्राण्यांसोबत मस्ती करायला अनेकांना आवडतं. घरात छोट्या पाळीव प्राण्यांचं संगोपन करणं आणि त्यांची योग्य देखभाल करण्यासाठी काही लोक नेहमीच अग्रेसर असतात. एका रशियन महिलेनंही मांजरीचं पिल्लू समजून एका खतरनाक प्राण्याला पाळलं. मात्र, काही महिन्यांनी ते पिल्लू मोठं झाल्यावर त्या महिलेला धक्काच बसला. कारण ते मांजरीचं पिल्लू नसून खतरनाक ब्लॅक पॅंथर असल्याचं समोर आलं. या महिलेनं या बिबट्याची कशाप्रकारे देखभाल केलीय, हे एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, महिलेला एका बिबट्याचं पिल्लू सापडतं आणि त्या प्राण्याची देखभाल करण्यासाठी महिला त्याला घरी घेऊन येते. पिल्लू काही दिवसांनंतर मोठं झाल्यावर त्या महिलेच्या लक्षात येतं की, हे मांजरीचं पिल्लू नसून एक ब्लॅक पॅंथर आहे. @factmayor नावाच्या यूजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. २१ सप्टेंबरला शेअर करण्यात आलेला या व्हिडीओला आतापर्यंत ९ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. इथे पाहा व्हिडीओ तसंच १४ लाखांहून अधिक लाईक्सही या व्हिडीओला मिळाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, या बिबट्याला एका कुत्र्यासोबत पाळलं, हे खूप चांगलं केलं. कारण या प्राण्याने त्याच्याकडून 'गुड बॉय' प्रोटोकॉल शिकून घेतलं असेल.