Sachin Tendulkar Called liar By Virat Kohli Fan: काल, ३१ मेला सचिन तेंडुलकरने आपल्या X अकाउंटवरून पोस्ट करत तंबाखूच्या सेवनाला विरोध करण्यासाठी एक खास पोस्ट केली होती. पण या पोस्टची आता भलत्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे. याखाली ‘विराट कोहली का फॅन’ या अकाऊंटवरून केलेली कमेंट अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या युजरने चक्क सचिन तेंडुलकरला खोटारडा म्हणत एक जुना संदर्भ जोडला आहे.

सचिन तेंडुलकरची पोस्ट काय होती?

सचिन तेंडुलकरने ३१ मेला आपल्या X (पूर्व ट्विटर) अकाउंटवर पोस्ट लिहिली की, “माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीला, माझ्या वडिलांनी मला एक साधा पण महत्त्वाचा सल्ला दिला: तंबाखूला कधीही प्रोत्साहन देऊ नका. मी या सल्ल्याचे पालन करत जगलो आहे आणि तुम्हीही जगू शकता. उत्तम भविष्यासाठी तंबाखूपेक्षा आरोग्याची निवड करूया.”

Ali Fajal News
अली फजलचं वक्तव्य, “मिर्झापूरमधल्या गुड्डूच्या भूमिकेसाठी मी पहिली निवड नव्हतो, कारण…”
Suryakumar Yadav Anniversary Post
सूर्यकुमारने सांगितलं सर्वात महत्त्वाची ‘ही’ कॅच आठ वर्षांपूर्वीच घेतली; फोटोचं कॅप्शन वाचून चाहते खुश; म्हणाले, “दादा तू GOAT”
Abhishek Sharma Reveals about Century
IND vs ZIM : अभिषेक शर्माने शतकाचे श्रेय शुबमन गिलला दिले; म्हणाला, ‘मी लहानपणापासून त्याच्या…’
captain anshuman singh smriti singh viral video
शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर किर्ती चक्र; वीरपत्नीनं सांगितला अखेरचा संवाद, म्हणाल्या, “आम्ही पुढच्या आयुष्याचे…”
Maa Tujhe Salaam Virat Kohli Hardik Pandya Team India sang song with fans in Wankhede Stadium
Victory Parade : “मां तुझे सलाम…”, टीम इंडियाने हजारो चाहत्यांसह गायले गाणे, वानखेडेवरील VIDEO व्हायरल
Virat recalls 15 years with Rohit
Victory Parade : “मी १५ वर्ष रोहितबरोबर खेळतोय, त्याला इतकं भावुक कधीच पाहिलं नाही…’, विराटकडून हिटमॅनचं कौतुक
Rohit Sharma talking about captain cool video viral
VIDEO : एमएस धोनीने कौतुक करताच भारावला रोहित शर्मा; म्हणाला, ‘माही भाई तर…’
Kapil Dev advice to Team India Play as a team not individuals
IND vs ENG : ‘आपण बुमराह-अर्शदीपवर अवलंबून असू तर…’, कपिल देवचा टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला, सांगितला १९८३ चा गेम प्लॅन ​​

सचिनच्या पोस्टखालील मजेशीर कमेंट

युजरने लिहिले की, “हा माणूस (सचिन तेंडुलकर) शुद्ध खोटारडा आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेकदा तंबाखूचा प्रचार केला आहे. अगदी १९९८ मध्ये शारजाह येथे याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा ‘धुव्वा’ उडवला होता.”

विराट कोहलीचा चाहता सचिनला खोटारडा का म्हणाला?

विराट कोहलीचा चाहता या अकाऊंटवरून केलेल्या कमेंटचा मूळ संदर्भ सुद्धा आपण पाहूया. या युजरने सचिनच्या ‘वाळूचे वादळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इनिंगवरून हे भाष्य केले आहे. कोका- कोला चषक १९८८ दरम्यान सचिनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर १३१ चेंडूंमध्ये १४३ धावा ठोकल्या होत्या. सचिनच्या या शंभर नंबरी खेळीमुळे भारताचा विजय झाला नसला तरी निव्वळ धावगती सुधारून भारत अंतिम फेरीसाठी पात्र झाला होता. याच खेळात खऱ्या वाळवंटातील वादळाने सुद्धा व्यत्यय आला होता.

काही दिवसांनंतर त्याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३१ चेंडूत १३४ धावा केल्या होत्या व भारताने चार गडी राखून विजय मिळवून ट्रॉफीवर नाव कोरले होते. या ‘धुव्वादार’ फलंदाजीचा संदर्भ देत या युजरने केलेली कमेंट सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे.

हे ही वाचा<< सचिन तेंडुलकरची ‘तंबाखू’वर पोस्ट; सेहवाग व गावसकर यांना चार वाक्यात खरंच सुनावलं का? म्हणाला, “मी जसा जगलो आहे..”

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

दरम्यान, सचिनच्या पोस्ट इतकीच ‘विराट कोहलीचा फॅन’ या अकाउंटवरून केलेली कमेंट सुद्धा व्हायरल होत आहे. या कमेंटवरच साधारण १० हुन जास्त रिप्लाय आहेत. एकाने म्हटलं की, “मी आता या युजरने ब्लॉक करून रिपोर्ट करण्यासाठी दुसरं अकाउंट उघडणारच होतो तेवढ्यात पूर्ण कमेंट वाचली आणि १० मिनिटं भरपूर हसलो.” तर अनेकांनी या युजरला त्याच्याप्रमाणेच उपहासाने उत्तर देत “आता तू शिव्या खाणारच होतास पण वाचलास, बरं झालं लोकांनी आधी तुझी कमेंट वाचली नाहीतर तू मार खाण्यासारखी गोष्ट केली होतीस.” असंही लिहिलं आहे.