scorecardresearch

क्रिकेटच्या देवाला चुलीवरच्या जेवणाची भुरळ; गावरान तूप चाखताच सचिन तेंडुलकर म्हणाला, “आयुष्यात कधी…” पाहा Video

सचिन तेंडुलकरने घेतला चुलीवरील स्वयंपाकाचा आस्वाद. आपल्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने.

क्रिकेटच्या देवाला चुलीवरच्या जेवणाची भुरळ; गावरान तूप चाखताच सचिन तेंडुलकर म्हणाला, “आयुष्यात कधी…” पाहा Video
(Photo-instagram/sachintendulkar) क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने घेतला चुलीवरील जेवणाचा आस्वाद.

क्रिकेट जगतातील महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता बरीच वर्षे झाली. मात्र, आजही त्याची लोकप्रियता कायम आहे. जगभरातील क्रिकेटचा चाहता वर्ग सचिनवर अजूनही तितकंच प्रेम करतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. सचिनचा साधेपणा सर्वश्रूत आहे. त्याच्या साधेपणाची झलक नुकतीच राजस्थानमध्ये पाहायला मिळाली. सचिनचा एक व्हिडिओ त्याच्या साधेपणामुळे खूप चर्चेत आलाय. या व्हिडीओत सचिन तेंडुलकर चुलीवरच्या स्वयंपाकाची चव घेताना दिसत आहेत. चला तर नेमकं या व्हिडीओत काय म्हणतोय सचिन जाणून घेऊया.

व्हिडीओत नेमकं आहे तरी काय?

सचिन तेंडुलकरने नुकताच राजस्थानमध्ये एक फेरफटका मारला. सचिनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात दोन राजस्थानी महिला चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. त्यांच्याजवळ सचिन तेंडुलकर जातो आणि त्यांच्या गप्पा रंगतात. या व्हिडिओत त्या दोन्ही महिला गहू आणि बाजरीची भाकरी बनवत आहेत, असं सचिनने सांगितलं. यावेळी सचिनेने त्यांच्यासोबत जमिनिवर बसून चुलीवर शिजवलेल्या जेवणाची चव घेतली आणि त्या दोन्हीं महिलांचे कौतुकही करतो.

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

या व्हिडीओत सचिन त्या महिलांना म्हणाला, “चुलीवर शिजवलेल्या जेवणाची चव नेहमीच अनोखी असते,” गॅसवर शिजवलेल्या अन्नापेक्षा ते अधिक चविष्ट असतं.” ,असं त्याने म्हटलं. तसेच ‘जेवण मी पण बनवतो, पण मला रोटी गोल बनवता येत नाही. त्याने देशी तुपाची त्यांनी वास घेतली. एवढा तूप मी माझ्या जीवनात कधी खाल्ला नाही. पण, हा तूप आवडीनं खाणार, असं यावेळी सचिन म्हणतो. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 13:16 IST

संबंधित बातम्या