scorecardresearch

Video: सचिन तेंडुलकरचा रोमँटिक अंदाज झाला Viral; हॉटेलमध्येच असं काही केलं की अंजली लाजून..

Viral Video: तेंडुलकरने सोशल मीडियावर अंजलीला एक गोंडस सरप्राईज दिलं आहे. यावरूनच या जोडयापात एकमेकांच्या कामाबद्दल किती आदर व प्रेम आहे हे सिद्ध होतं.

Video: सचिन तेंडुलकरचा रोमँटिक अंदाज झाला Viral; हॉटेलमध्येच असं काही केलं की अंजली लाजून..
Video: सचिन तेंडुलकरचा रोमँटिक अंदाज झाला Viral (फोटो: इंस्टाग्राम)

Sachin Tendulkar Romantic Video: सचिन तेंडुलकरने आजवर अनेकदा क्रिकेटच्या मैदानात अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली आहे. यामागे त्याची अपार मेहनत व कष्ट आहेच. याशिवाय सचिनच्या पाठीशी खंभीर उभी राहणारी त्याची पत्नी अंजली सुद्धा या यशाची तितकीच भागीदार आहे. स्वतः सचिनने कित्येकवेळा मुलाखतीमध्ये आपल्या यशाचं श्रेय अंजलीला दिलं आहे. अंजलीने घर सांभाळलं म्हणून मी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकलो असे म्हणत सचिनने कित्येकदा सर्वांसमोर न बोलता आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. यावेळी मात्र तेंडुलकरने सोशल मीडियावर अंजलीला एक गोंडस सरप्राईज दिलं आहे. मास्टर ब्लास्टरचा रोमँटिक अंदाज पाहून चाहतेही खुश झाले आहेत.

सचिन व अंजली ही जोडी आजही सर्वात रोमँटिक सेलिब्रिटी जोडी म्हणून ओळखली जाते. इंडिया टुडेला २०१९ मध्ये दिलेल्या मुलाखतीत सचिनने सांगितले होते की, “मी भारतासाठी चांगली कामगिरी करत होतो आणि अंजली तिच्या परीक्षेत पहिली आली होती.ती सुवर्णपदक विजेती डॉक्टर आहे म्हणून… तिची कारकीर्दही भरभराटीला आली होती आणि ती एका वेगळ्या उंचीवर पोहोचणार होती पण तिने आपल्या करिअरचा त्याग करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून आम्ही कुटुंबाचा सांभाळ करू शकू.” यावरूनच या जोडयापात एकमेकांच्या कामाबद्दल किती आदर व प्रेम आहे हे सिद्ध होतं.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सचिन एका रेस्टॉरंटमध्ये बसलेला दिसतो. त्यानंतर त्याने एक प्लेट दाखवली ज्यावर काही रोमँटिक ओळी लिहिलेल्या आहेत. त्यांनतर कॅमेरा टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या अंजलीच्या दिशेने वळला यावेळी अंजलीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला पुन्हा एकदा Aww म्हणायला ही जोडी भाग पाडेल. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकरचा रोमँटिक अंदाज

हे ही वाचा<< Video: सारा तेंडुलकरला सापडली तिची हुबेहूब कॉपी; सचिनच्या लेकीला ओळखणंच झालं कठीण

दरम्यान, बुधवारी, सचिनचा लेक अर्जुनने गोव्यासाठी खेळताना राजस्थानविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या पदार्पण सामन्यात शतक झळकावून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली आहे. सचिनने १९८८ मध्ये रणजी ट्रॉफी पदार्पणात शतक झळकावले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 09:59 IST

संबंधित बातम्या