Young Boys made Jugaad Vehicle :जुगाड हे भारतीय लोकांचे असे कौशल्य आहे जे जगभरात इतर कुठेही सापडणार नाही. जुगाड भारतीयांच्या रोजच्या जीवनातील भाग आहे. भारतीय लोकांसमोर जेव्हा अशी समस्या उभी राहते जी सोडवण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे किंवा साधणे नाही तर तक्रार करत नाही ते ती समस्या सोडवण्यासाठी जुगाड शोधतात. भारतीयांच्या जुगाडचे कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका जुगाडची भूरळ चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यालाही पडली आहे.
जुगाडू गाडी पाहून रस्त्यात थांबला सचिन तेंडूलकर
एका रोड ट्रिप दरम्यान सचिन तेंडुलकरला असे काही दिसले की तो स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने थेट गाडी थांबवली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. त्याचे झाले असे की, सचिन तेंडूलकरला रस्त्यावर काही मुले दिसली जी एका वेगळ्याच प्रकारच्या गाडीमध्ये बसले होते. ही गाडी जुगाड वापरून तयार केली होती जी ना बाईक सारखी होती ना कारसारखी. पण ही जुगाड गाडी पाहून सचिन तेंडुलकर इतके प्रभावित झाले की ती गाडी पाहण्यासाठी स्वत: थांबले.
सचिन तेंडूलकरने शेअर केला जुगाड गाडीचा व्हिडीओ
माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने हा हृदयस्पर्शी अनुभव ‘एक्स’ (X) वर शेअर केला, जिथे त्यांनी मुलांचा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये मुले अभिमानाने आपला शोध दाखवत आहेत: एक छोटी गाडी, जी पूर्णपणे ऐनवेळी केलेल्या कल्पकतेने आणि बदलाने बनवली आहे.
कशी तयार केली जुगाड गाडी?
ही गाडी सायकलचे दोन चाक वापरून तयार केली होती पण सायकलसारखी अजिबात दिसत नव्हती. या मुलांनी सायकलच्या चांकाच्या मधोमध एक बांबू लावलेला दिसत आहे. त्या बांबूला ओढता येईल अशा प्रकारे दोन बांबू लावलेले दिसत आहे. चांकावर लावलेल्या बांबूवर बसल्यानंतर समोर पकडण्यासाठी एक छोटा बांबू आडवा लावलेला आहे. एक मुलगा ही गाडी ओढत आहे तर एक मुलगा त्या गाडीवर हवेत पाय घेऊन बसलेला आहे. भरधाव वेगाने ही गाडी रस्त्याने धावत आहे. लहान मुले या गाडीतून फिरण्याचा आनंद घेताना दिसत आहे.
जुगाड गाडीबाबत काय म्हणाला सचिन तेंडूलकर
ही क्लिप ऑनलाइन शेअर करताना तेंडुलकरने लिहिले, “भारताच्या अनेक दुर्गम भागांपैकी एका भागातून गाडी चालवत असताना, आम्ही एका अशा ‘कार’ला पाहण्यासाठी थांबलो, जी शोरूममधून आलेली नसून निव्वळ कल्पनाशक्तीतून साकारली होती. ही अशी प्रतिभा आहे जी योग्य परिस्थितीची वाट पाहत नाही, ती कोणत्याही परिस्थितीत मार्ग शोधून काढतेच. त्यांना फक्त एका संधी मिळाली पाहिजे.”
सचिनने केले चिमुकल्यांचे तोंडभरून कौतुक
व्हिडीओमध्ये सचिन तेंडूलकर या गाडीचे कौतुक केले आहे. ते सांगतात की, आम्ही इथे एका लहान मुलांची एक गाडी दिसली ती पाहण्यासाठी आम्ही थांबलो. पण ते मुले आम्हाला बघून घाबरून पळून गेले. . त्यांची गाडी पाहून आम्ही आमची गाडी बाजूला घेतली कारण आम्हाला ही गाडी बघायची होती. यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना बोलवले आहे. ही गाडी कशी चालते हे दाखवा आम्हाला.”
ते पुढे म्हणाले की, लहान गोष्टींमधूनच मोठ्या गोष्टी घडतात गरज असते ती त्यांना प्रोत्साहन देण्याची आणि वेळ देण्याची.
नेटकऱ्यांना आवडली जुगाड गाडी
या पोस्टने ऑनलाइन लगेचच लोकांची मने जिंकली, आणि अनेक वापरकर्त्यांनी मुलांच्या कल्पकतेची तसेच तळागाळातील प्रतिभेबद्दल तेंडुलकरने दाखवलेल्या कौतुकाची प्रशंसा केली. अनेक लोकांनी निदर्शनास आणून दिले की, विशेषतः देशाच्या ग्रामीण भागांमध्ये, नवोन्मेष अनेकदा गरज आणि मर्यादित संसाधनांमधूनच उदयास येतो.
काहींनी त्या मुलांना “भविष्यातील इंजिनिअर” म्हटले, तर काहींनी गंमतीने म्हटले की, त्या हाताने बनवलेल्या गाडीचे मायलेज “बहुतेक गाड्यांपेक्षा चांगले आहे.”
हा व्हिडिओ एक हृदयस्पर्शी आठवण आहे जो ही शिकवण देतो, सर्जनशीलता नेहमीच वर्गखोल्या किंवा प्रयोगशाळांमध्ये जन्माला येत नाही. कधीकधी, ती केवळ कुतूहल, टीम वर्क आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर, गावातील धुळीच्या रस्त्यांवरून उदयास येते.
