scorecardresearch

“हे पाहून मला दु:ख होतं की माझे फोटो…”, सचिन तेंडुलकरची ट्विटर पोस्ट तुफान व्हायरल!

सचिन तेंडुलकरनं त्याच्या फोटोंविषयी ट्विटरवर चाहत्यांना आवाहन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

Sachin Tendulkar says casino used his morphed images to take legal action
सचिन तेंडुलकर (संग्रहीत छायाचित्र)

मास्टर-ब्लास्टर म्हणून कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सचिन तेंडुलकर यानं केलेली एक ट्विटर पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये या पोस्टला हजारो लाईक्स, रीट्वीट्स मिळू लागले आहेत. या पोस्टमध्ये सचिननं आपल्या चाहत्यांसाठी एका गोष्टीचा खुलासा केला असून त्यासंदर्भात आपल्याला होत असलेलं दु:ख देखील त्यानं व्यक्त करून दाखवलं आहे. तसेच, यासंदर्भात कायदेशीर मार्गाने कारवाई करणार असल्याचं देखील त्यानं म्हटलं आहे.

काय आहे ट्वीटमध्ये?

सचिन तेंडुलकरनं ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्याचे फोटो काही कसिनो ब्रँड्सकडून मार्केटिंगसाठी वापरले जात असल्याचं समोर आलं होतं. त्यासंदर्भात बरीच चर्चा झाल्यानंतर सचिन तेंडुलरकरनं स्वत: त्यावर खुलासा करणारं ट्वीट केलं आहे.

सचिन तेंडुलकर ट्वीटमध्ये म्हणतो…

आपल्या ट्वीटमध्ये सचिन तेंडुलकरनं या सर्व प्रकरणावर सविस्तर खुलासा केला आहे. “माझ्या हे लक्षात आलं आहे की सोशल मीडियावर अनेक कसिनोवाल्यांकडून माझा फोटो चुकीच्या पद्धतीने वापरून जाहिरात केली जात आहे. मी कधीही जुगार, तंबाखू किंवा मद्याचं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समर्थन केलेलं नाही. मला हे पाहून दु:ख होतं की माझे फोटो लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी वापरला जात आहे”, असं सचिननं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“माझी लीगल टीम यासंदर्भात योग्य ती पावलं उचलणारच आहे. पण तरी देखील मला वाटलं की यासंदर्भात योग्य ती माहिती सगळ्यांना सांगणं आवश्यक आहे”, असं देखील सचिननं आपल्या पोस्टमध्ये शेवटी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sachin tendulkar twitter post appeals people not believing social post morphed photos pmw

ताज्या बातम्या