Bull Emotional Video : शेतकऱ्याचे बैलांप्रति अतिशय भावनिक असे नाते असते. शेतकऱ्याचा सच्चा सोबती जर कोण असेल ना तर तो बैल असतो. वर्षाचे ३६५ दिवस विनातक्रार तो शेतात मालकासह राबत असतो. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता तो नेहमीच कामाला तयार असतो. त्यामुळे मातीला कष्टाशिवाय आणि शेतीला बैलाशिवाय पर्याय नाही, असे म्हटले जाते. शेतकरी आपल्या बैलावर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करतो, त्याला काही दुखलं, खुपलं, तर तो त्याची काळजी घेतो. पण, बैल जोपर्यंत शेतात राबतोय, तोपर्यंतच त्याला किंमत असते. असे असले तरी बैलाचा एक असाही व्हिडीओ आता समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांनी सलाम त्या शेतकरी राजाला ज्यानं हे रत्न सांभाळलं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. कारण- या व्हिडीओतील बैलाची अवस्था पाहून कोणालाही वाईट वाटेल; पण त्या शेतकऱ्यानं बैलाच्या वाईट परिस्थितीतही त्याला एकटं सोडलं नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अपंग बैलाचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्याला सलाम

प्राणी मुके असल्याने ते बोलू शकत नाहीत; पण त्यांनाही अडचणी असतात, त्यांनाही दु:ख होतं याची प्रचिती हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला येईल. यातून शेतकऱ्याचं आपल्या बैलावर किती प्रेम आहे हे समजतं. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक अपंग बैल चिखलातून मार्ग काढत जात आहे. उंचीनं कमी असलेला हा बैल एका पायानं अपंग आहे. त्यामुळे चिखलातून चालताना त्याला अडचण येत आहे. पण, तरीही तो न थांबता इतर बैलांच्या मागून हळूहळू चालतोय.

Kokan Bhajan Dabalbari viral video
व्वा मानलं बुवा! भजनात चक्क डोक्यानी वाजवली पेटी; Video पाहून युजर म्हणाला, “नादखुळा…”
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
shocking video viral
भयंकर! हातातून मोबाईल हिसकावल्याचा राग, लहान मुलाने आईच्या डोक्यात घातली बॅट; थरारक घटनेचा Video Viral
Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan makes a trophy bet with Nikki Tamboli
Video: “अरबाजने सॉरी म्हटल्यावर लगेच तू त्याच्या गळ्यात पडणार” म्हणत सूरजने निक्कीला लगावला टोला अन् लावली ट्रॉफीची पैज
bigg boss marathi suraj chavan family enters in the house
Video : “तुझ्यामुळे आज आम्ही…”, घरात आल्या सूरज चव्हाणच्या बहिणी व आत्या; ‘ते’ शब्द ऐकताच सर्वांचेच डोळे पाणावले
aarya jadhao on her wild card entry in Bigg boss marathi 5
बिग बॉसने घराबाहेर काढल्यावर चॅनलने संपर्क केला का? आर्या जाधवने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली…
Man dances in front of police in ganpati visarjan mirvnuk viral video
पठ्ठ्याची हिंमत तर बघा! मिरवणूकीत चक्क पोलिसांसमोर केला डान्स अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “एक तरी नमुना…”
cockroach stuck in throat heres what happened next read full news
झोपेत व्यक्तीच्या नाकात शिरलं झुरळ अन्…; पुढे जे काही झालं, ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का

हेही वाचा – तुम्ही रस्त्यावर लिंबू सरबत पिताय? मग हा किळसवाणा Video पाहाच, पुन्हा पिण्यापूर्वी विचार कराल १०० वेळा

बैलाची ही अवस्था पाहून एखाद्या शेतकऱ्यानं त्याला वाऱ्यावर सोडून दिलं असतं; पण हा शेतकरी मात्र आपल्या लेकराप्रमाणे त्या बैलाचा सांभाळ करतोय. त्यामुळे अनेक जण आता अपंग बैलाचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्याला सलाम करीत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून बैलाप्रति दु:ख व्यक्त केलं आहे.

naad_ekch_bailgada_sharyaticha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांनी अपंग बैलाचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्याचं कौतुक केलं आहे. एका युजरनं लिहिलंय की, दादा, खरंच तुम्ही जी सेवा करीत आहात ना ती पाहता, तुम्हाला परमेश्वर काहीच कमी पडू देणार नाही. दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, शेतकऱ्यांच्या या श्रीमंतीस अंबानीपण तोड देऊ शकत नाहीत. तिसऱ्या एकानं लिहिलंय की, शेतकरी देवमाणूसच आहे. कोणताही प्रसंग असू दे माघार घेत नाही. चौथ्या एका युजरने लिहिलंय की, मागे वळून बघतो, त्यातच खरं प्रेम दिसतंय मालकाचं.