Amazing Car Viral Video: नवीन वर्षात घरात नव्या पाहुण्याचं आगमन होण्यासाठी म्हणजेच कार खरेदी करण्यासाठी लोकांची लगबग वाढली आहे. पण एका भन्नाट कारच्या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कार खरेदीची मागणी वाढली असतानाच या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचं कारणंही तितकच खास आहे. एका कार डिझायनरच्या डोक्यात जबरदस्त कल्पना आली अन् त्याने जबरदस्त स्टाईलची कार बनवली. या कारचा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. कार रस्त्यावर धावताच अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, असं या कारचं वैशिष्ट्य आहे.
कारची चाके वर अन् गाडी रस्त्यावर, पाहा व्हिडीओ
रस्त्यावरून निळ्या आणि सफेद रंगाची छटा असलेली कार एक व्यक्ती चालवताना व्हिडीओत दिसत आहे. ही एका कार एका सुनसान रस्त्यावर फिरताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर असं वाटतंय, जणू काही कारला उलटच केलं आहे. कारची चाके ढगाकडे पाहत असतानाही कार रस्त्यावर धावताना दिसत आहे, हे दृष्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. कारला अशाप्रकारे डिझाईन केलंय, जे पाहून तुम्हाला वाटेल ही कार कधीच सरळ नव्हती. या कारचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
कारचा हा व्हिडीओ @BornAKang नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 533.5k व्यूज मिळाले आहेत. तर ३९ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. कार खरेदी करायला गेल्यावर अनेक प्रकारच्या डिझाईन कारच्या शॉपमध्ये पाहायला मिळतात. पण अशाप्रकारचं डिझाईन तुम्ही याआधी कधी पाहिलं नसेल. कारचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाकांशिवाय कार रस्त्यावर चालते का? असं प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. कारण कारची डिझाईनच भन्नाट केली आहे. चाके आकाशात पाहतात आणि कार रस्त्यावर धावते, अशा प्रकरची अप्रतिम डिझाईन एका व्यक्तीने केली आहे. कारचा व्हिडीओला इंटरनेटवर हजारोंच्या संख्येत लाईक्स मिळत आहेत आणि कार डिझायनवर कौतुकाचा वर्षावही केला जात आहे.