Sara Tendulkar Finds her Doppelganger In Canada Shocking Reaction of Sachin Tendulkar Daughter Instagram | Loksatta

Video: सारा तेंडुलकरला सापडली तिची हुबेहूब कॉपी; सचिनच्या लेकीला ओळखणंच झालं कठीण

Sara Tendulkar Instagram: असं म्हणतात आपल्या सारख्याच समान चेहऱ्याचे जगभरात एकूण ७ चेहरे असतात. साराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये

Video: सारा तेंडुलकरला सापडली तिची हुबेहूब कॉपी; सचिनच्या लेकीला ओळखणंच झालं कठीण
सारा तेंडुलकरला सापडली तिची हुबेहूब कॉपी; सचिनच्या लेकीला ओळखणंच झालं कठीण (फोटो: इंस्टाग्राम)

Sara Tendulkar Doppelganger: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर हिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. एखाद्या हिरोईनला मागे टाकेल इतकं साराचं फॅन फॉलोईंग आहे. साराच्या इंस्टाग्रामवरील प्रत्येक फोटोला हजारो- लाखोंमध्ये लाईक्स व कमेंट असतात आणि असणारच ना? तेंडुलकरची लेक दिसण्यात, बोलण्यात अशी लाखात एक आहेच. पण याच साराला आता आपल्यासारखी हुबेहूब दिसणारी एक तरुणी भेटली आहे. साराने स्वतः या तरुणीसह आपला फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

साराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये एक कॅनेडियन तरुणी अँड्रिया हिचा व्हिडीओ शेअर केला होता. ही अँड्रिया साराची हुबेहूब कॉपी आहे. साराने या स्टोरीवर असेच कॅप्शन लिहून “हॅलो, Doppelganger, आता फक्त अजून पाच जणांना शोधायचं आहे” असे म्हंटले होते.

सारा तेंडुलकरची कॉपी

दरम्यान साराच्या पाच जण आणखी शोधायचे आहेत या वाक्यावरून अनेकांना प्रश्न पडत आहे. तर याचं स्पष्टीकरण म्हणजे, असं म्हणतात आपल्या सारख्याच समान चेहऱ्याचे जगभरात एकूण ७ चेहरे असतात. त्यामुळे साराने स्वतःसह अँड्रियाला मोजून आता अजून ५ जण शोधायचे आहेत असे म्हंटले आहे.

सारा तेंडुलकर तिच्या फॅशनेबल लुकमुळे सोशल मीडियावर अनेकांचे मन जिंकत आहे. साराने बॉलिवूडमध्ये एंट्री केलेली नसली तरी ती अनेकदा बॉलिवूड पार्टी, इव्हेंट्स आणि फॅशन शोजचा भाग असते. अनेकांना कल्पना नसेल पण सारा तेंडुलकर ही वैद्यकीय पदवीधर आहे. सचिन तेंडुलकरने २४ मे १९९५ ला अंजली तेंडुलकरसह लग्न केले होते. १२ ऑक्टोबर १९९७ ला सचिन- अंजली यांना साराच्या रूपात पहिलेच कन्यारत्न प्राप्त झाले होते.

सारा तेंडुलकर सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर २.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिलसोबत साराचे नाव जोडले गेले होते मात्र मागील काही काळात शुबमन व सारा अली खान यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 17:18 IST
Next Story
Viral Video: अतिउत्साहात तरूणीसोबत डान्स करायला गेला आणि थेट स्टेजमध्ये घुसला