…म्हणून ट्रेंड होतोय #sareetwitter?

फक्त सामान्य महिलाच नाही तर राजकारणी, समाजकारणी, सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्रींनी साडीमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

ट्विटरवर सध्या #sareetwitter हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. साडी इज सो टिपीकल म्हणणाऱ्या मुलींनाही याच साडीत सुंदर सुंदर फोटो #sareetwitter या हॅशटॅगच्या नावाने अपलोड करताना पाहायला मिळत आहेत. सोमवारी या ट्रेंडला सुरूवात झाली. मागील दोन दिवसांमध्ये लाखो महिलांनी #sareetwitter या हॅशटॅगचा वापर करत फोटो पोस्ट केले आहेत. फक्त सामान्य महिलाच नाही तर राजकारणी, समाजकारणी, सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्रींनी साडीमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

न्यूयॉक टाईम्स या मासिकात छापलेल्या एका लेखानंतर झाली #sareetwitter? या ट्रेण्डची सुरुवात झाल्याचे म्हटले जातेय. या लेखामध्ये साडीचा इतिहास आणि प्रतिष्ठाबद्दल माहिती देण्यात आली होती. याच लेखात भाजपा सत्तेत आल्यानंतर साडीला खूप प्रमोट केलं जात आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी बनारसी साडी विणकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. असेही म्हटले आहे. या लेखातील साडीविषयीच्या तर्काने अनेकजण नाराज झाले आणि #SareeTwitter ची सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे.

अनेक कलाकारांनी साडीमधील आपले फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये अयुष्यमान खुरानाचाही समावेश आहे. आयुष्यमान खुराना गुरूवारी सकाळी साडीमधील आपला फोटो ट्विटरवर पोस्ट केला. बुधवारी काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनीही आपला साडीमधील फोटो पोस्ट केला होता. यासोबत भाजपाच्या नुपूर शर्मा, अभिनेत्री रेणुका शहाणे, नगमा, दिव्या दत्ता, यामी गौतम, गुल पनाग यांसारख्या अनेकींनी आपलं साडीप्रेम ट्विटरवर पोस्टमार्फत व्यक्त केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Saree twitter trend why women are sharing photos in saree nck