Husband cheated on wife with girlfriend: पती-पत्नीने एकमेकांसोबत दगा केलेल्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. दरम्यान अशाच एका पत्नीने आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर रंगेहाथ पकडल्याचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर मध्ये एका महिलेने तिच्या पतीला गर्लफ्रेंडबरोबर पकडले. संतापलेल्या पत्नीने त्या महिलेला केसांना पकडून मारहाण केली, परंतु या सगळ्यात नवऱ्याने हस्तक्षेप केला नाही. उषा आर्य अशी ओळख असलेल्या महिलेने काही दिवसांपूर्वी तिचा सरपंच पती जितेंद्र माळी याचे त्याच्या गर्लफ्रेंड पूजासोबतचे रोमँटिक चॅट्स पाहिले. त्यानंतर तिने या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय.

a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Guy went to marry for the second time without getting divorced first wife creates ruckus in marriage hall video goes viral
नवऱ्याचं लफडं बायकोनं पकडलं! दुसरं लग्न करताना अचानक समोर आली अन्; खतरनाक VIDEO व्हायरल
Shocking video during wedding grooms friends fello down fro dj truck while dancing
मित्राच्या वरातीत ट्रकवर चढून नाचणं आलं अंगलट; ब्रेक दाबला अन् अख्खा गृप तोंडावर आपटला, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Husband wife dance video
VIDEO: “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे” नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले
wedding guest beaten in up viral video
लग्नात आलेल्या पाहुण्याचा ‘हा’ कसला पाहुणचार? वीजेच्या खांबाला बांधलं अन् धू धू धुतलं, VIDEOमध्ये पाहा नेमकं काय घडलं
Gwalior Man Smokes Cigarette After Setting Household Items On Fire Following Quarrel With Wife
बायकोशी झालं भांडणं, नवऱ्यानं रागात सोन्यासारखा अख्खा संसार जाळून टाकला; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Groom's Hilarious funny Ukhana
“…आई आई नाही; बायको बायको करायचं” नवरदेवाने सांगितला भन्नाट उखाणा, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा… हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सरपंच जितेंद्र माळी आणि त्याची कथित प्रेयसी एका कारमध्ये दिसत आहे. यादरम्यान, सरपंचाची पत्नी तिथे हजर होते आणि संतापलेली पत्नी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात करते. ती सरपंचाच्या गर्लफ्रेंडला अनेक वेळा मारहाण करताना आणि तिला कारमधून बाहेर येण्याची धमकी देताना दिसते. या सगळ्या घटनेदरम्यान प्रेयसी सरपंचाच्या पत्नीला विचारले की, “तू कोण आहेस? मी तुला ओळखतही नाही.” यावर पत्नीसोबत आलेला एक पुरुष म्हणतो, “ठाणे में बताएंगे हम कौन है. (पोलीस स्टेशनमध्ये सांगतो की आम्ही कोण आहोत.)

हा व्हायरल व्हिडीओ @indorehighlights या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. FPJच्या वृत्तानसार , नीमचमधील सावन गावचे सरपंच जितेंद्र माळी (४५) यांची दुसरी पत्नी उषा आर्य यांनी बुधवारी पतीला प्रेयसीसह कारमध्ये बसले असताना पकडले. विशेष म्हणजे तो इंदूर रोडवरील लाल गेटजवळील एका हॉटेलमध्ये आपल्या गर्लफ्रेंडसह राहत होता असं आहे. त्यांना पाहताच उषा गर्लफ्रेंडच्या अंगावर धावून गेल्या. गोंधळ झाल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तिघांनाही नानाखेडा पोलिस ठाण्यात नेले.

हेही वाचा… VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप

जितेंद्रला दोन पत्नी आहेत, तिसऱ्यांदा लग्न करायचे आहे

जितेंद्रला आधीच दोन बायका होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांना प्रत्येकी दोन मुलंही होती असंही वृत्त आहे. सरपंच माळी यांचे पहिले लग्न २० वर्षांपूर्वी सपना माळीसोबत झाले होते. त्यानंतर माळी यांनी आरोग्य विभागात तैनात असलेल्या उषा आर्यसोबत लग्न केले. जितेंद्रला तिसरे लग्न करायचे होते, असा आरोप आता उषाने केला आहे. यावेळी त्याला पूजा या अंगणवाडी सेविकेशी लग्न करायचे आहे.

उषाने पोलिसांना माहिती दिली की, तिने काही दिवसांपूर्वी तिच्या पतीचे पूजासोबतचे रोमँटिक चॅट्स वाचले. तिने आपल्या पतीला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याने लक्ष दिले नाही. ती पुढे म्हणाली की तिने पूजाशीदेखील बोलणे केले पण सगळे व्यर्थ होते. या दोघांच्या प्रतिकारामुळे तिला टोकाचे पाऊल उचलावे लागले.

Story img Loader