Sarpanch Viral Video : नवरा-बायकोचं नातं हे पवित्र नातं मानलं जातं; पण काही जण लग्नानंतरही परस्त्रीबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवतात. अनेकदा अशा विवाहबाह्य संबंधांमुळे नात्यात दरी निर्माण होतेच; शिवाय समाजात नाचक्कीदेखील होते. अनेकदा विवाहबाह्य संबंध सर्वांसमोर उघड होतात. अशा वेळी लोकांना तोंड दाखविण्यासाठी जागा राहत नाही. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यात एका सरपंचाला त्याच्या पत्नी कारमधून गर्लफ्रेंडबरोबर जाताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्या गर्लफ्रेंडची भररस्त्यात बायकोने अशी अवस्था केली की, तिला पुन्हा लोकांना तोंड दाखविण्यासाठी जागा ठेवली नाही.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळाली आहे. व्हिडीओमध्ये कारमध्ये सरपंच नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड बसले होते. दोघेही लाँग ड्राईव्हसाठी निघाले होते, इतक्यात समोरून सरपंचाची बायको आली आणि तिनं कारमध्येच दोघांना रंगेहाथ पकडले. दोघांना एकत्र पाहून संतापलेल्या बायकोनं कारचा दरवाजा उघडला आणि गर्लफ्रेंडची चांगलीच धुलाई करायला सुरुवात केली. यावेळी तिचा सरपंच नवरा मात्र लाजेनं मान टाकून बसला होता. त्याच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Shocking video man caught stealing bra panties in Bhopal video goes viral
बापरे आता तर हद्दच पार केली! चोर आला महिलांचे वाळत घातलेले अंतर्वस्त्र घेतले अन्…VIDEO पाहून येईल संताप
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा

सरपंच नवऱ्याला गर्लफ्रेंडबरोबर रंगेहाथ पकडलं

त्याचं झालं असं की, नीमचित जिल्ह्याच्या सरपंचाचे दुसऱ्या महिलेबरोबर म्हणजे एका अंगणवाडी सेविकेबरोबर विवाहबाह्य संबंध सुरू असल्याचा संशय त्याच्या बायकोला होता. त्यामुळे तिनं नवरा कुठे जातो, कोणाला भेटतो यावर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. एक दिवस सरपंच गर्लफ्रेंडबरोबर एका हॉटेलमधून बाहेर निघाला. त्यानंतर कारमध्ये बसून दोघे लाँग ड्राईव्हसाठी निघत होते. इतक्यात भररस्त्यात बायकोनं दोघांना रंगेहाथ पकडले. तिनं रस्त्यातच सरपंच नवऱ्यासह त्याच्या गर्लफ्रेंडला शिवीगाळ केली, यानंतर तिला केसांना पकडून मारहाण सुरू केली.

बायकोनं त्या महिलेचा कुर्ता पकडला अन् तिला चांगलाच चोप दिला. दोघांना एकत्र पाहून बायकोचा राग अनावर झाल्याने तिने नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला कारमध्ये असताना मारलंच. त्याशिवाय नंतर पुन्हा तिला कारमधून खाली उतरवून केसाला पकडून थोबाडीत मारण्यास सुरुवात केली. गर्लफ्रेंड स्वत:ला वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागली. तिनं सरपंचाला तुझ्या बायकोला आवर, अशी विनंती केली; पण तो लाजेनं तसाच कारमध्ये बसून राहिला. तो काहीच करू शकला नाही. कारण- त्याच्या बायकोनं तिच्याबरोबर काही नातेवाईकदेखील आणले होते.

थरारक अपघात! भरधाव कारच्या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर आदळली अन् नंतर केलं असं काही की…; VIDEO पाहून बसेल धक्का

भररस्त्यात सुरू असलेला हा तमाशा पाहण्यासाठी आजूबाजूला बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी कॅमेऱ्यात ही घटना केली. त्यामुळे हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

Story img Loader