“कायम घरुनच काम केलं तर…”; सत्या नाडेलांचा ‘पर्मनन्ट वर्क फ्रॉम होम’ला विरोध

कार्मचाऱ्यांबद्दलची चिंता व्यक्त करत नाडेला यांनी पर्मनन्ट वर्क फ्रॉम होमला विरोध केला आहे, ते म्हणतात…

सत्या नाडेलांचा विरोध

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये मागील अनेक आठवड्यांपासून सुरु असणाऱ्या लॉकडाउनदरम्यान हजारो कर्मचारी वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करत होते. मात्र जगभरातील काही अपवाद वगळता सर्वच देशामध्ये करोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना २०२० संपेपर्यंत आणि ट्विटरसारख्या कंपन्यांनी तर हवे तेवढे दिवस घरुन काम करण्याची मूभा कर्मचाऱ्यांना दिली आहे. असं असलं तरी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी कायमच्या वर्क फ्रॉम होमला विरोध असल्याचे म्हटले आहे. पर्मनन्ट वर्क फ्रॉम होमला विरोध करताना नाडेला यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे कारण दिलं आहे. नाडेल यांनी न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना यासंदर्भात आपले मत मांडले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांमध्ये फेसबुक, ट्विटर आणि गुगलसारख्या माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील बड्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना अजून बराच काळ घरुनच काम करण्याची मूभा दिली आहे. भारतामध्येही काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुढील काही महिने घरुनच काम करावे लागणार असल्याचे स्पष्ट कल्पना दिल्याचे समजते. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र घरुन काम करण्याचे दुष्परिणाम असल्याचे मत नाडेल यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलं आहे.

नाडेला यांनी व्हिडिओ कॉलवरील बैठकींना विरोध असल्याचे सांगत आपल्याला ऑफिसमधील एकंदरित वातावरण आणि बैठकींची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे. “जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात बैठकीला जाता तेव्हा तुम्ही समोर असणाऱ्या व्यक्तीशी थेट संवाद साधत असता. असा संवाद साधताना तुम्ही प्रत्यक्ष शाब्दिक संवादाबरोबरच त्या व्यक्तींची जोडले जाता,” असं नाडेला यांनी म्हटलं आहे.

वर्क फ्रॉम होम हे कायमसाठी लागू झाले तर एक गोंधळावर उपाय म्हणून आपण दुसरा गोंधळ घालणार आहोत असं स्पष्ट मत नाडेल यांनी व्यक्त केलं आहे. घरुन काम करताना कर्मचाऱ्यांवर येणारा मानसिक आरोग्य आणि ताण याबद्दल नाडेला यांनी चिंता व्यक्त केली. “घरुन काम करताना मानसिक आरोग्याचे काय होणार? एकमेकांशी संवाद साधणे आणि समुदाय म्हणून वावरण्याच्या आपल्या सवयींचं काय होणार? मला असं वाटतयं की सध्या ज्याप्रकारे आपण सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणांवरुन काम करत आहोत त्यामाध्यमातून आपण सामाजिक नातेसंबंधांचे (कार्यालयातील सहकाऱ्यांबरोबर असणारे नातेसंबंध) भांडवल खर्च करत आहोत. यावर उपाय काय आहे?,” असा सवाल नाडेला यांनी उपस्थित केला.

ट्विटरने मागील आठवड्यामध्येच करोनाची साथ संपल्यानंतरही कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्यास सांगण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं त्यानंतरच नाडेला यांनी हे मत व्यक्त केलं. ट्विटरने प्रत्यक्ष मेन्टेनन्समध्ये काम करणाऱ्या व्यक्तींशिवाय इतर सर्वजणांनी घरुनच काम करावे असं स्पष्ट केलं आहे. ट्विटरने २०२० सालातील सर्व प्रत्यक्ष बैठका रद्द केल्या असून २०२१ मधील नियोजनाचे काम सुरु केलं आहे. घरुन काम करणाऱ्यांसाठी एक हजार डॉलर अतिरिक्त निधी देण्याचा निर्णयही ट्विटरने घेतला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Satya nadella is against permanent work from home says its not good for employees health scsg

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या