scorecardresearch

Premium

VIDEO : रँम्पवर मॉडेलऐवजी ड्रोन, सौदीतला फॅशन शो जगभरात थट्टेचा विषय

याची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ड्रोनला कपडे अडकवून ते ड्रोन फिरवणं म्हणजे फॅशन शो कमी आणि भयपट पाहणं जास्त वाटत आहे अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे.

जेद्दाहमध्ये गेल्या आठवड्यात हा शो पार पडला. यावेळी चक्क ड्रोनला कपडे अडकवण्यात आले होते.
जेद्दाहमध्ये गेल्या आठवड्यात हा शो पार पडला. यावेळी चक्क ड्रोनला कपडे अडकवण्यात आले होते.

जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक देश म्हणून सौदी अरेबिया ओळखला जातो, येथे पैशांची श्रीमंती असली तरी कित्येक बाबतीत हा देश मागासलेला आहे. आजही स्त्रियांना येथे स्वातंत्र्य देणं म्हणजे कमीपणाचं मानलं जातं, पण हळूहळू या देशातही बदल होत आहे. काही दिवसांपूर्वी येथे फॅशन शोही पार पडला. अर्थात कॅमेरा आणि पुरूषांना पूर्णपणे बंदी या दोन अटींवर हो- नाही करत फॅशन शो पार पाडण्यात आल्याच्या चर्चा दोन महिन्यंपूर्वी होत्या. आता सौदीतला आणखी एक फॅशन शो चर्चेत आलाय आणि चर्चेत येण्यामागचं कारणंही तसंच विचित्र आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या या फॅशन शोमध्ये चक्क ड्रोनला कपडे अडकवून हा ड्रोन रॅम्पवर फिरवण्यात आला, त्यामुळे हा ‘फॅशन शो’ कमी आणि एखादं भयपटातलं दृश्य अधिक वाटतं होतं.

जेद्दाहमध्ये गेल्या आठवड्यात हा शो पार पडला. यावेळी चक्क ड्रोनला कपडे अडकवण्यात आले होते. आजही येथे फॅशनशोमध्ये महिलानं मॉडेलिंग करणं गुन्हा मानला जातो, त्यामुळे रमजानच्या महिन्यात पार पडण्यात आलेल्या या फॅशन शोमध्ये महिला मॉडेल किंवा मॅनीक्वीनला कपडे घालून ते रँम्पवर उतरवण्यापेक्षा ड्रोनवर अडकवून ते हॉटेलमध्ये फिरवण्यात आले. हा फॅशन शो पाहण्याची परवानगी फक्त महिलांनाच देण्यात आली होती.

Viral Video Of Manchurian Making Upsets Internet
मंच्युरिअन खायला आवडतात का? मग एकदा हा व्हिडीओ बघाच! पुन्हा मंच्युरिअन खाण्यापूर्वी १०० वेळा कराल विचार
Jugaad Video
Jugaad Video : हद्दच केली राव! गॅस नाही म्हणून चक्क इस्त्रीवर बनवले ऑम्लेट, पाहा व्हायरल व्हिडीओ
man seen selling goods in a unique style video goes viral
‘कोमलच्या आईला डासांपासून वाचवा’…, वस्तू विकण्यासाठी विक्रेत्याची अनोखी स्टाईल; मजेशीर Video व्हायरल
a advertisement of ceiling fans company
शंभर पंख्यांचा वापर करून साकारला गणपती बाप्पा, होर्डिंगवरील जाहिरातीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

याची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सौदी अरेबियात फॅशन शो होतोय हे नक्कीच बदलाचं उदाहरण आहे पण त्यासाठी ड्रोनला कपडे अडकवून ते ड्रोन फिरवणं म्हणजे फॅशन शो कमी आणि भयपट पाहणं जास्त वाटत आहे अशा प्रतिक्रिया देत लोकांनी याची खिल्ली उडवली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Saudi arabia is making waves on social media for using drones on fashion show

First published on: 11-06-2018 at 10:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×