सोशल मीडियावर अनेकजण विविध खाद्य पदार्थ बनविण्याची रेसिपी पाहत असतात. शिवाय अनेक रेसिपी अशा असतात ज्यामध्ये तुमचा वेळ वाचवण्यासाठी काही शॉर्टकटही सांगितले जातात. पण सोशल मीडियावर सांगितल्या जाणाऱ्या शॉर्टकट रेसिपी बनवणं कसं अंगलट येऊ शकतं, याचं एक ताजं उदाहरणं समोर आलं आहे. ज्यामध्ये मायक्रोवेव्हमध्ये अंडी ठेवल्यामुळे एका महिलेसोबत असं काही झालं आहे. जे ती आयुष्यभर विसरु शकणार नाही.
हो कारण एका महिलेने चक्क मायक्रोवेव्हमध्ये अंडी शिजवण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे तिचा चेहरा गंभीररीत्या भाजला आहे. फूड व्लॉगर साफिया बशीर हीला पोच्ड अंडी बनवायची होती, जी टिक टॉकवर ट्रेंड करत आहे. यासाठी तिने अंडी पाण्यात ठेवून मायक्रोवेव्हमध्ये ठेवली. अंडी उकळल्यानंतर ती बाहेर काढण्यासाठी तिने चमचा पाण्यात घातला त्यावेळी अचानक अंडी फुटून तिच्या चेहऱ्यावर आदळली.




अंडी फुटल्याने भाजला चेहरा –
साफियाच्या चेहऱ्यावर गरम अंडी आदळल्याने तिचा चेहरा गंभीररीत्या भाजला आहे. या अपघातानंतर साफिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शिवाय ही अंडी पुर्णपणे शिजली नव्हती ती थोडी उकडली होती असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे या महिलेने चमचा लावताच अंडी फुटली आणि तिच्या चेहऱ्यावर आदळली, ज्यामुळे ती गंभीररीत्या भाजली. तर या अपघाताची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
हेही पाहा- काय सांगता! चक्क तिसऱ्या दिवशी मूल रांगायला लागलं; आईपण आश्चर्यचकित, पाहा व्हायरल Video
साफियाने तिच्याबरोबर घेडलेली घटना शेअर करताना एका वेबसाइटला सांगितले की, “मला इतर कोणीही हे करू नये असे वाटते, कारण सध्या टिकटॉकवर याचा ट्रेंड सुरु आहे, त्यामुळे मी लोकांना सावध करते.” ती पुढे म्हणाली ही माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक आणि भयानक अनुभव होता. मला खूप त्रास झाला. मी अंड्याजवळ चमचा घेऊन गेली तोच अंडी कारंज्यासारखी फुटली.” साफियाने सांगितले की, जेव्हा मला भूक लागली तेव्हा मी ती डिश बनवण्याचा निर्णय घेतला. या अपघाताने मला खूप वाईट अनुभव दिला आहे. आता माझा चेहरा ठीक झाला आहे.