scorecardresearch

Viral Video: बाथरुममध्ये आरामात उभा होता व्यक्ती; मागे पाहताच दिसलं भयानक भूत, पुढे घडलं असं की…

Viral video: दिसलं भयानक भूत, पुढे घडलं असं की…

scary ghost standing behind man in toilet watch funny prank viral video
प्रँक व्हिडीओ बनवणं पडलं महागात

Viral video: जरा विचार करा, तुम्ही रात्री टॉयलेटला गेलात आणि अचानक तुमच्या मागे कोणीतरी उभे असलेले दिसले तर तुमची रिअॅक्शन काय असेल? तुमची नक्कीच भीतीनं गाळण उडेल. किंवा एखादा तिथेच चक्कर येऊन पडेल. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती टॉयलेटमध्ये जाताना दिसत आहे. तो ज्या टॉयलेटमध्ये जात होता तिथे एक भूत त्याची वाट पाहत आहे याची त्याला कल्पना नव्हती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रात्रीच्या वेळी टॉयलेटमध्ये शिरताना दिसत आहे, जिथे पांढरा कपडा गुंडाळून एक भूत आधीच उभं आहे. सुरुवातीला त्या व्यक्तीला कल्पना नसते की कोणीतरी त्याच्या मागे उभे आहे. पण काही वेळाने भूत त्याच्या जवळ जाऊन काही बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या माणसाची नजर त्याच्यावर पडते. हे पाहताच तो भयंकर घाबरतो आणि जोरजोरात ओरडू लागतो. तो इतक्या जोरात घाबरतो की ते भूतही घाबरतं.

You Will Tremble After Watching This Video
बापरे! हा व्यक्ती स्वत:च्याच बोटांवर कोयत्याचे वार करतोय; VIDEO पाहून उडेल थरकाप
Akshara-Adhipati
‘असा’ असेल अक्षरा-अधिपतीचा राजेशाही विवाह सोहळा, लग्नात येणारे ट्विस्ट अँड टर्न्स समोर, घ्या जाणून
kitchen tips in marathi how to keep jewellery safe in toilet home jugaad video trending
Jugaad: घराबाहेर जाताना टॉयलेटमध्ये ठेवा दागिने; काय आहे फायदा VIDEO एकदा पाहाच
prank on mom
VIDEO: आईला मुलाने दिलं इतकं भयानक गिफ्ट; बॉक्स उघडताच भीतीने थरकाप, पाहा आत काय होतं

पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा ती व्यक्ती ओरडते तेव्हा भूतही घाबरते आणि पळून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र त्यानं टॉयलेटचा दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न करताच त्या व्यक्तीने भूताला पकडले आणि त्याला धडा शिकवण्याचा प्रयत्न सुरू केला. पण ते भूत पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान हा एक प्रँक व्हिडीओ असून काही वेळासाठी सगळेच घाबरले होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ज्या गाडीचं वडिलांनी आयुष्यभर स्वप्न पाहिलं…मुलांनी तिचं गाडी गिफ्ट केली; VIDEO पाहून डोळे पाणावतील

हा प्रँक व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने म्हटले की, ‘कोणासोबतही अशी मस्करी करू नका. एखाद्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तुम्ही विनोद करत आहात. पण समोरच्याला हे कळत नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Scary ghost standing behind man in toilet watch funny prank viral video srk

First published on: 20-11-2023 at 16:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×