Premium

रात्री ऑफिसच्या सीसीटीव्हीत कैद झालं भयानक दृश्य; नाईट शिफ्ट करत असाल तर VIDEO पाहून उडेल थरकाप

Viral video: ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात असं दृश्य कैद झालं की पाहूनच थरकाप उडेल.

Scary! Paranormal activity in office caught on CCTV, is this ghost? – Watch viral Video
रात्रीच्या वेळी पाहा ऑफिसमध्ये काय होतं( Twitter)

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी मनोरंजक तर कधी धक्कादायक व्हिडीओ येथे समोर येत असतात. पण सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. हो कारण या व्हिडीओत रात्रीच्या वेळी ऑफिसमधलं भयानक दृश्य कैद झालं आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या ऑफिसमध्ये आपण दिवसभर काम करतो, तिथ रात्रीच्या वेळी काय होत असेल याचा तुम्ही कधी विचार केलाय का? काही जण ऑफिसमध्ये नाईट शिफ्ट करत असतील, काहींना या गोष्टींचा अनुभव आला असेल तर काहींना नाही. हे कितपत खरं आहे हे माहिती नाही, मात्र समोर आलेला व्हिडीओ पाहूनच थरकाप उडेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता, ऑफिसमध्ये रात्रीच्या वेळेतील हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिल्यावर कदाचित तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये कधी रात्री थांबवण्याची वेळ आली तर तुमची हिंमतच होणार नाही. असं या ऑफिसमध्ये काय घडतं आहे ते तुम्हीच पाहा.

ऑफिसमध्ये एकही माणूस दिसत नाही. अचानक एका कॉम्प्युटरची लाइट पेटते. थोड्या वेळाने सर्व कॉम्प्युटर अचानक आपोआप सुरू होताना दिसतात. काही जणांना हे पहिलंच दृश्य पाहून धडकी भरली असेल तर काही जणांनी लाइटचा काहीतरी प्रॉब्लेम असावा असं म्हटलं असेल. .

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कपलचे मेट्रोमध्ये अश्लिल चाळे, किस करत…Video पाहून नेटकरी म्हणतायेत,”मुलाला नाहीतर मुलीला तरी..”

पुढे तुम्ही पाहाल एक एक अशी घटना घडते की तुम्हाला विश्वास बसणार नाही. एका ठिकाणी दरवाजाचा हँडल फिरताना दिसतं, तिथं कुणीच नाही. त्यानंतर कपाटाचे ड्रॉव्हर आपोआप उघडताना दिसतात. हे पाहून खरंच भीती वाटत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होतअसून अनेक जणांना धडकी भरली आहे तर काही जण हे खोटं असल्याचा दावा करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Scary paranormal activity in office caught on cctv is this ghost watch viral video srk

First published on: 26-09-2023 at 10:09 IST
Next Story
VIDEO: बेल्जियममध्ये लेझीम व ढोल-ताशाच्या गजरात गणेशोत्सव साजरा