School Boy Viral Letter : बालपण हे अगदी निरागस असते. या वयात मुलं त्यांच्या मनाला वाटेल, आवडेल आणि रुचेल अशाच गोष्टी करतात. काही मुलांना शाळेत जायला आवडते, अभ्यास करायला आवडतो. मित्रांबरोबर मज्जा मस्ती, खेळायला आवडते. पण, काही मुलं अशी असतात की, ज्यांना या गोष्टींमध्ये अजिबात रस नसतो. मुळात त्यांना शाळेत जाणेच आवडत नाही.

सोशल मीडियावरही मुलांच्या मजेदार उत्तर पत्रिका आणि विविध गोष्टींच्या अर्जाचे फोटो व्हायरल होतात. सध्या सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या सुट्टीच्या अर्जाचा फोटो व्हायरल होतोय, जो वाचून तुम्हाला हसू आवरणे अवघड होईल.

हेही वाचा : हद्दच झाली राव! मुंबई लोकलच्या दरवाजावर उभं राहून तरुणानं केलं असं काही की..; video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

विद्यार्थ्याचा सुट्टीसाठी थेट मुख्याध्यापकांना केला मजेशीर अर्ज (School Boy Funny Letter)

व्हायरल अर्जाच्या फोटोमध्ये एका सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने थेट मुख्याध्यापिकेकडे सुट्टीची विनंती केली आहे, हा अर्ज आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्याने अर्जाच्या अगदी सुरुवातीला माननीय मुख्याध्यापिका आणि इयत्ता ७ वी असे नमूद केले आहे. त्यानंतर डिअर मॅडम असे लिहून पुढे थेट ‘मी येणार नाही’ लिहिलेय, त्याने पुढेही दोन वेळा मी येणार नाही असेच लिहिले आहे. अर्जाच्या शेवटी त्याने त्याची सही केली आणि तारीख लिहिली आहे.

Read More Trending News : साफसफाईची जीवघेणी हौस! कांजूरमार्गमधील इमारतीतील धडकी भरवणारे दृश्य; Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

सातवीतील विद्यार्थ्याचा सुट्टीचा हा अर्ज सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतोय, ज्यावर युजर्स आता मजेशीर भन्नाट कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “सीधी बात नो बकवास” दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, अरे हा अर्ज सुरू होताच संपला, तिसऱ्याने लिहिले की, जर तो येणारच नाही तर कशाचं टेंशन, शेवटी एकाने लिहिले आहे की, बेटा ही घे तुझी टीसी आणि तू कधीच येऊ नको.”