चिमुकल्याची ही जादू पाहून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल, पाहा हा VIRAL VIDEO

या व्हायरल व्हिडीओमधल्या मुलाला हातचलाखी पाहून लोक आश्चर्यचकित होऊ लागतात. हा व्हिडीओ शाळेच्या वर्गात शूट करण्यात आलाय.

Amazing-Magic-Trick
(Photo: Instagram/ sahil.aazam)

तुम्हाला जादूचे खेळ आवडतात का? अगदी बच्चे कंपनीपासून ते आजी-आजोबांपर्यंत साऱ्यांनाच जादूचे खेळ पाहणं फार आवडतं. हा खेळ पाहत असताना वयस्कर माणसं सुद्धा त्यांच्या लहानपणीच्या आठवणीत रमतात. रस्त्यावर कुणी आपली जादू दाखवत असेल तर ते पाहण्यासाठी अक्षरशः गर्दी जमते. पण प्रत्यक्षात जादू वैगेर असं काही नसतं. ते केवळ हातचलाखीचा एक भाग असतो. ते छोट्या-छोट्या गोष्टी आपली नजर चुकवत गायब करत असतात. यात मजेदार गोष्ट ही असते की, त्यांची ही हातचलाखी समोरच्या व्यक्तीच्या लक्षातही येत नाही. सोशल मीडियावर अशाच एका मजेदार जादूचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमधल्या मुलाला हातचलाखी पाहून लोक आश्चर्यचकित होऊ लागतात. हा व्हिडीओ शाळेच्या वर्गात शूट करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळकरी मुलगा सर्वांसमोर दोन्ही हाताखाली दोन छोटे दगड घेतो आणि एका झटक्यात ते दोन्ही दगड त्याच्या एकाच हाताखाली एकत्र येतात. या छोट्या जादूगाराचे अप्रतिम कौशल्य पाहून व्हिडीओ शूट करणाराच नव्हे तर नेटिझन्स सुद्धा थक्क झाले आहेत. हे पाहून कॅमेरामनला त्याच्या डोळ्यांवर विश्वास होत नव्हता म्हणून त्याने या मुलाला पुन्हा ही जादू करण्यासाठी सांगताना दिसून येत आहे. हे वाचून तुम्हाला सुद्धा हा जादू पाहण्यासाठीची उत्सुकता झाली असेल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ही जादू पाहा.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चमत्कार! कुटुंबाचं सुरू होतं एकत्र जेवण, अचानक कोसळला सिलिंग फॅन, पाहा कसा वाचला मुलाचा जीव

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावरुन सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांच्या क्रिएटीव्हीटीला उधाण

हा व्हिडीओ sahil.aazam नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. लोक हा व्हिडीओ पाहून भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. हा चिमुकला एक दिवस एक महान जादूगार होईल, असं काही युजर्स बोलत आहेत. तर इतरांनी त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे कौतुक केले. एका यूजरने लिहिले की, ‘या मुलाच्या हातचलाखी अप्रतिम आहे. तो मॅजिक ट्रिक करण्यात मास्टर आहे.’ त्याच्या व्हिडीओला आतापर्यंत ८० मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: School boys amazing magic trick impresses internet viral video has 80 million views prp

Next Story
VIDEO: “३० जून माझी तारीख असेल, १ जुलै उजाडू देणार नाही,” भाजपा नेते मोहित कम्बोज यांचा इशारा ठरला खरा; व्हिडीओ व्हायरल
फोटो गॅलरी