परीक्षेचा ताण दूर करण्यासाठी महाविद्यालयात चक्क श्वानाची नियुक्ती

मुलांच्या मनावरील ताण हलका होईल

मुलांच्या मनावरील ताण हलका करण्यासाठी त्यांनी एका कुत्र्याची नियुक्ती केलीय

परीक्षा म्हटलं की प्रत्येक विद्यार्थ्याला टेन्शन असतंच. परीक्षेची कितीही तयारी झाली असली तरीही मनावर एकप्रकारचं दडपण असतं. ऐनवेळी काही आठवलं नाही किंवा पेपर कठीण आला , वेळच पुरली नाही असे एक ना दोन शंभर विचार मनात येतात तेव्हा परीक्षेचं दडपण मुलांच्या मनावर खूप असतं, विद्यार्थी कितीही हुशार असला तरी तो परीक्षेचा ताण मनावर येतो. अनेकदा मुलांच्या मनावरचा परीक्षेचा ताण हलका व्हावा यासाठीच त्यांचं समुपदेशन केलं जातं. पण ब्रिटनमधल्या एका महाविद्यालयाने मुलांच्या मनावरचा ताण हलका करण्यासाठी एक नवी कल्पना वापरली आहे.

वाचा : नवरदेवाचा नागीण डान्स पाहून नवरीनं लग्नच मोडलं

मुलांच्या मनावरील ताण हलका करण्यासाठी त्यांनी एका कुत्र्याची नियुक्ती केलीय. काय वाचून आश्चर्याचा धक्का बसला ना? पण लंडनमधल्या Tavistock College ने मुलांच्या मनावरचा ताण हलका करण्यासाठी एका श्वानाची नियुक्ती केलीय. शोला असं या कुत्र्याच्या पिल्लाचं नाव आहे. ते फक्त चार महिन्यांचं आहे. परीक्षा सुरू होण्याआधी ती विद्यार्थ्यांना भेटणार आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणार आहे. त्यामुळे मुलांच्या मनावरचा ताण हलका होईल असं इथल्या शिक्षकांचं मत आहे. अनेक देशांत तणावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉग किंवा फिश थेरपीचा वापर केला जातो. कुत्र्याच्या सानिध्यात काही काळ घालवल्यानं तणावग्रस्त माणूस जरा तणावमुक्त होतो असं एका संशोधनातून निदर्शनास आलंय म्हणून  त्यांनी ही पद्धत वापरली आहे.

वाचा : प्रदूषण रोखणाऱ्या अशा इमारती आपल्याकडंही बांधता येतील का?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: School employs puppy to exam stress