Premium

शाळकरी मुलीनं पकडला सर्वात खतरनाक साप, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

शाळेतील विद्यार्थीनीने खतरनाक सापाची शेपटी पकडली अन् पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

Indian Snake Shocking Video Viral
शाळकरी मुलीनं खतरनाक साप पकडला. (Image-Instagram)

School Girl Catches Indian Snake Video Viral : सोशल मीडियावर खतरनाक सापांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जंगलात किंवा एखाद्या सोसायटीत साप आढळल्यावर सर्पमित्र तातडीनं त्या ठिकाणी धाव घेतात आणि सापांना पकडतात. पण इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या सापाच्या एका व्हिडीओनं सर्वांनाच धक्का दिला आहे. कारण एका शाळकरी मुलीनं चक्क धामण जातीचा साप पकडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थीनीने हा साप पकडून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून या विद्यार्थीनीने सापांबद्दल माहिती सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

@kadappampatil नावाच्या यूजरने सापाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, शाळकरी मुलगी धामण सापाला हातात पकडून त्या सापाबद्दल माहिती देते. धामण साप बिनविषारी असून शेतातील उंदारांना खातो, त्यामुळे तो शेतकऱ्याचा मित्र असतो. लोकांनी या सापाला मारू नये, असं आवाहनही या चिमुकल्या मुलीनं केलं आहे. या विद्यार्थीनीनं सापाची शेपटी हातात पकडून त्याला जमिनीवर सरपटत ठेवल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – चित्रपटगृहात बाहेरील खाद्यपदार्थ लपवून नेण्यासाठी तरुणाने केला अनोखा जुगाड, Video पाहून नेटकरीही झाले थक्क

इथे पाहा व्हिडीओ

धामण सापाची लांबू ५ फूटांहून अधिक असते. धामण साप बिनविषारी जरी असले, तरी हे साप माणसांवर हल्लाही करतात. पण या चिमुकलीने अतिशय सावधपणे या सापाला पकडलं आणि व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना जागृत केलं. सापाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओला २ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच सापाच्या या खतरनाक व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: School girl catches dangerous indian snake video clip viral on instagram ptyas mucosa videos nss

First published on: 21-09-2023 at 13:45 IST
Next Story
एआयच्या मदतीने तयार केली मुंबईच्या घरांची ‘अशी’ अनोखी छायाचित्रे…