Viral love letter: एक काळ होता जेव्हा प्रेमी युगल युगल आपत्र प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना पत्र लिहायचे. पण मोबाईल फोन आल्यापासून पत्रांचा ट्रेंड जवळपास नाहिसाच झाला आहे. आता बॉयफ्रेंड थेट व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून जानूनं जेवण केलं की नाही ते विचारतो. पण तरी देखील इंटरनेटवर अधूनमधून काही लव्ह लेटर्स व्हायरल होताना दिसतात. अन् या पत्रांमधील मजकूर वाचून खरंच हसू आवरत नाही. असंच एक गंमतीशीर पत्र आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे पत्र शाळेतल्या विद्यार्थ्यांचं असून वाचून तुम्हीही पोट दुखेपर्यंत हसाल एवढं नक्की. हे पत्र आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय.

अंकिता नावाच्या एका मुलीनं आकाशसाठी हे पत्र लिहिलं आहे. या पत्रातला मजकूर आणि हस्ताक्षर पाहाता ते शाळेत जाणाऱ्या एखाद्या मुलीनं लिहलेय असं वाटतंय. तिला एखाद्या मुलानं वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांसमोर प्रपोज केलंय. पण तिला हे प्रकरण कळू द्यायचं नाही. त्यामुळे तिनं नकार दिला. पण खरं तर मनातून तिचाही जीव त्या मुलामध्ये अडकलाय. अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या मुलीनं हे प्रेम पत्र लिहलेय. पत्रात ती म्हणते, “तु मला प्रपोज केलं आणि मी तुला जे काही बोलले त्यासाठी सर्वात आधी सॉरी. नंतर मी विचार केला आणि माझं मन मला सांगत होतं, तुच आहेस तो ज्याची मी वाट बघते. जर माझ्याआधी तुला कोण आवडत असेल तर नाही म्हणालास तरी चालेल. तुझं माझ्यावर खर प्रेम असेल तर ‘हो’ म्हण.” सोबतच तिनं एक कविता देखील लिहिली आहे.

“माझं हृदय तुला दिलं

तुझं हृदय मला दे

प्रेम करते तुझ्यावर एवढं तरी समजून घे

तुझी अंकिता…”

हे अनोखं पत्र इंटरनेटवर व्हायरल होत असून नेटकरी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहे.

पाहा पत्र

हेही वाचा >> VIDEO: देशी दारुची पॉवर! ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

हे पत्र marathi_epic_jokes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. हे पत्र वाचून खरंच तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. अनेकांना हे निब्बा निब्बीचं प्रेमप्रकरण वाटतंय.प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. प्रेमाचे अनेक हटके किस्से देखील समोर येत असतात. अशाच एक गजब प्रेमाची गजब गोष्ट समोर आली आहे. पण या शाळेतल्या प्रेमाचा किस्सा ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.