phiri phiri nach pora ahirani song viral video : शाळेच्या दिवसांमधील शनिवार आठवला की, सकाळी ७ ची शाळा, डोळ्यांत अर्धी झोप, कवायत आणि त्यानंतरची हाफ डे शाळा असा आठवणींचा फ्लॅशबॅक अगदी डोळ्यासमोर येतो. पण, आता काळानुसार शिक्षणाचाही पद्धतही बदलू लागली आहेत. काही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हसत, खेळत, नाचत, गात शिकवले जाते आहे. त्यांचा शनिवार म्हणजे विद्यार्थ्यांचा मजा-मस्ती करण्याचा दिवस आहे. नेमकं या शाळेत शनिवारी काय घडते चला बातमीतून जाणून घेऊयात.
सध्या खानदेशी आणि अहिराणी लोकगीताने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गायिका मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजातील ‘फिरी फिरी नाच पोरा’ हे गाणे सध्या इन्स्टाग्राम वर प्रचंड ट्रेंड करत आहे. या गाण्याची क्रेझ एवढी वाढली आहे की, लहानमुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण यावर ठेका धरताना दिसत आहे. सध्या याच गाण्यावर शाळेतील विद्यार्थीनींनी भन्नाट डान्स केला आहे. विद्यार्थिनींचा ‘फिरी फिरी नाच’ गाण्यावर कसा डान्स केला एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा.
विद्यार्थिनींचा शाळेचा गणवेश, केसांच्या दोन घट्ट बांधलेल्या वेण्या, एकसारख्या डान्स स्टेप्स आणि त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह अगदी बघण्यासारखा आहे. त्यामुळे नेटकरी देखील त्यांचा डान्स पाहून कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @prof.raj_metkar_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘फिरी फिरी नाच… हसत-खेळत, नाचत-गात शिकण्याचा आनंद! आनंददायी शनिवार म्हणजे शाळेतला मस्तीचा’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हिडीओ पाहून ‘आमच्या वेळी एकतर कचरा गोळा करणे, नाहीतर पीछे मूड,आगे मूड…….एक दो एक असे खेळ असायचे’, ‘राडा होणार पोरी नाही ऐकणार’, ‘का यार आमचा वेळी अशी गाणी नव्हती आणि असा शनिवार सुद्धा’, ‘शनिवार म्हणजे निम्या झोपेत आम्ही सकाळी शाळेत असायचो. असे गाणे तर तेव्हा नव्हतेच आणि चुकून आलं एखाद आणि कोणी नाचलंच तरी फटके’ , ‘यालाच झेडपीची शाळा म्हणतात’, ‘आत्ता पर्यंतचा बेस्ट डान्स’, ‘हेच वय आहे…करून घ्या मज्जा करा पोरांना, पोरींना’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
