Viral video: शाळा म्हणजे फक्त अभ्यास नसतो. शाळेत ज्ञानबरोबर इतर कलागुणांना वाव दिला जातो. त्यामुळे शाळा असो की महाविद्यालय वार्षिक महोत्सव होत असतो. त्यातून लहान लहान विद्यार्थी आपली चमक दाखवत असतात. महाविद्यालयातील या कलागुणांमुळे पुढे अनेक कलाकार घडले आहेत. सोशल मीडियावर शाळेतील कार्यक्रमांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता सोशल मीडियावर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकाचा भन्नाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खानदेशी गाण्यावर शिक्षिकानं विद्यार्थ्यांसोबत केलेला हा डान्स नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. त्यामुळे त्याच्यावर कमेंटचा पाऊस सुरु झाला आहे.
शाळा सुरु झाल्या की विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे दडपण येते. शाळेत तास, होमवर्क आणि शिकवणी यामध्ये विद्यार्थ्यांचे बालपण हारवत चालले आहे. परंतु काही शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवणारे शिक्षक असतात. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील शिक्षकही वेगळी वाट निवडत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि शाळेची गोडी निर्माण करतात.त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात, तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात संगमनेरमधल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि विद्यार्था डान्स करताना दिसत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह शिक्षक असावा तर असा..
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शिक्षक हे स्टेजवर विद्यार्थ्यांच्या समोर नाचत आहेत. खानदेशीगाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे. त्यांच्या सोबत विद्यार्थी उभे आहेत. जे वेगवेगळ्या इयत्तेतील दिसत आहेत. या विद्यार्थ्यांनीही शिक्षकांसोबत गाण्यावर ताल धरला आहे.शिक्षकांबरोबरच विद्यार्थीदोखील उत्साहाने डान्स करताना दिसत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्याही डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायला देखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांसोबत रिल्स बनवताना दिसतात. अशाच जिल्हापरिषद शाळेत हा उपक्रम राबवला आणि विद्यार्थ्यांसोबतच सर्व शिक्षक देखील थिरकले. रोज रोजच्या अभ्यासाने विद्यार्थी देखील कंटाळलेले असतात. या विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमुळे एक ऊर्जा मिळते आणि शाळा हवीहवीशी वाटते.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ shrikant_mahajan_2001 नावाच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. “आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक पाटील सर यांनी मुलांसोबत खानदेशी गाण्यावर जबरदस्त डान्स बसवला निंभोरा जि. छ. संभाजीनगर”,” असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत उपक्रमाचे कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय, “आमच्या गावातील शिक्षक कृष्णा पाटील सर हे फक्त सांस्कृतिक कार्यक्रमातच नाही तर अभ्यासातही मुलांना गुणवान बनवतात म्हणून तर आम्हाला व सर्व निंभोरातील गोरगरीब जनतेच्या विश्वासाला कृष्णा पाटील सर यांनी जिंकल आहे कारण असा एक शिक्षक घडायला भरपूर वेळ लागतो ज्याच्यात सर्व गुण संपन्न असे सर्व प्रकारची कला आहे असे शिक्षक जर प्रत्येक गावाला लाभले तर मी तर म्हणतो लवकरच जिल्हा परिषद शाळेला चांगले दिवस येतील कृष्णा पाटील सरांना सर्व निंभोरा गावकऱ्यांच्य वतीने व शिक्षक प्रेमींच्या वतीने खूप खूप धन्यवाद त्यांनी आज शिक्षणासोबतच मुलांना स्टेज डेरिंग सुद्धा आणून दिली त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद व सर्व निंभोरा जिल्हा परिषद शाळेचे टीम यांचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद..” तर आणखी काहींनी, “छान वाटतं असं बघायला की एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यानं सोबत मनसोक्त नाचताना.” “हे फक्त मराठी शाळेतच घडू शकतं, इंग्लिश मेडीयम म्हणजे फक्त व्यवहार आहे, मुलांनी फि भरली नाही तर शिक्षक च वर्गात किव्हा परीक्षेला बसू देत नाही. ..याउलट मराठी शाळेत वर्गात मुलांनी बसून शिकावे यासाठी प्रोत्साहित केले जाते.”
