Viral video: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्व जण बिनधास्त डान्स करताना दिसतात. शाळा कॉलेजातील मुलांचे सुद्धा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर हल्ली शिक्षकही मुलांबरोबर ताल धरतात. शाळा सुरु झाल्या की विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे दडपण येते. शाळेत तास, होमवर्क आणि शिकवणी यामध्ये विद्यार्थ्यांचे बालपण हारवत चालले आहे. परंतु काही शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवणारे शिक्षक असतात.

जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील शिक्षकही वेगळी वाट निवडत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि शाळेची गोडी निर्माण करतात.त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात, तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षक आणि विद्यार्था डान्स करताना दिसत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह शिक्षक असावा तर असा..

Dance Viral Video
‘तुझ्या रूपाचं चांदणं’ गाण्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Male teacher hug female student obscene video school student teacher viral video
“अरे तुझ्या मुलीसारखी ना ती?”, एकट्या विद्यार्थीनीला पाहून शिक्षकाने मारली मिठी अन्…, शाळेतील धक्कादायक VIDEO व्हायरल
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
school students couple dance so gracefully on marathi song
“माझं काळीज लागलंय नाचु न गानं वाजू दया” जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी जोडीने केला भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
Zilla Parishad's school teacher and students dance
‘आम्ही गड्या डोंगरचं राहणारं’, गाण्यावर शिक्षकाचा विद्यार्थ्यांसह रांगडा डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या शाळेची तादक’
video of a young girl dance on 26 January
Video : “अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे” २६ जानेवारीला तरुणीने सादर केलेला डान्स पाहून नेटकरी संतापले
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”

शाळा म्हणजे फक्त अभ्यास नसतो. शाळेत ज्ञानबरोबर इतर कलागुणांना वाव दिला जातो. त्यामुळे शाळा असो की महाविद्यालय वार्षिक महोत्सव होत असतो. त्यातून लहान लहान विद्यार्थी आपली चमक दाखवत असतात. महाविद्यालयातील या कलागुणांमुळे पुढे अनेक कलाकार घडले आहेत. सोशल मीडियावर शाळेतील कार्यक्रमांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता सोशल मीडियावर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा भन्नाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मराठमोळ्या गाण्यावर शिक्षकाने केलेला हा डान्स नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. त्यामुळे त्याच्यावर कमेंटचा पाऊस सुरु झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शिक्षक हे स्टेजवर विद्यार्थ्यांच्या समोर नाचत आहेत. “मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी” या गाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे. त्यांच्या सोबत विद्यार्थी उभे आहेत. जे वेगवेगळ्या इयत्तेतील दिसत आहेत. या विद्यार्थ्यांनीही शिक्षकांसोबत गाण्यावर ताल धरला आहे.शिक्षकांबरोबरच विद्यार्थीदोखील उत्साहाने डान्स करताना दिसत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्याही डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायला देखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मजुराची १३व्या मजल्यावरुन उडी; दोनदा जाळीत अडकला अन् शेवटी…VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास

सोशल मीडियावर हा व्हिडीओ vilas_digi_teacher नावाच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ‘आई शपथ सांगतो असे शिक्षक माझ्या वेळेसही नव्हते’, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत उपक्रमाचे कौतुक करत आहेत. 

Story img Loader