‘चंद्र’ हा आपल्या सर्वांचा आवडता आहे. चंद्र हा नेहमी पृथ्वीच्या बाजूने असल्याने चंद्रात होणाऱ्या प्रत्येक बदलाची सगळ्यांना नेहमीच उत्सुकता असते. खगोलप्रेमी हे चंद्रग्रहण, चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या अवकाशयानांकडे नेहमीच नजरा लावून बसलेले असतात… नुकतंच, ‘नासा’च्या खगोलशास्त्रज्ञांनी ‘चंद्राचा जुळा भाऊ’ शोधून काढला आहे. आकाशात आपल्या दिसतो त्याच्या व्यतिरिक्त अणखी एक चंद्र आहे, जो २१०० वर्षांपासून पृथ्वीसोबत आहे. याबाबत खगोलशास्त्रज्ञांचे मोठे संशोधन समोर आले आहे. या बातमीकडे या संबंधित प्रत्येक व्यक्ती ही या आशेने बघत आहे
खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीसोबत फिरणारा एक ग्रह शोधून काढला आहे. हा ग्रह दिसायला चंद्रासारखाच आहे. यामुळे खगोलशास्त्रज्ञांनी याला दुसरा चंद्र असे म्हटले आहे. 2023 FW13 असे या लघुग्रहाचे नाव आहे. मंगळ आणि शुक्र ग्रहाच्या मध्यभागी या लघुग्रहाचे स्थान आढळून आले आहे.
हवाईमधील कॅनडा-फ्रान्स-हवाई दुर्बिणी आणि ॲरिझोनामधील किट पीक नॅशनल ऑब्झर्व्हेटरी आणि माउंट लेमन स्कायसेंटरने या लघुग्रहाच्या अस्तित्वाला दुजोरा दिला आहे. सर्व गोष्टीची पडताळणी आणि शहानिशा करून १ एप्रिल रोजी या नव्या चंद्राबाबतची घोषणा करण्यात आली.
चंद्रासारखा दिसणारा 2023 FW13 हा लघुग्रह
२८ मार्च रोजी पॅन-स्टार्स सर्वेक्षण दुर्बिणीच्या सर्वेक्षणातून शास्त्रज्ञांना चंद्रासारखा दिसणारा 2023 FW13 हा लघुग्रह दिसून आला आहे. माउईच्या हवाई बेटावरील सुप्त ज्वालामुखी हालेकालावरील रात्रीच्या आकाशाची छायाचित्रे पॅन-स्टार्स दुर्बिणीच्या माध्यमातून टिपली गेली. यावेळी निरीक्षणादरम्यान हा लघुग्रह आढळून आला आहे. खगोलशास्त्रज्ञ टोनी डन यांनी बनवलेल्या ऑर्बिट सिम्युलेटरचा वापर करून हा लघुग्रह शोधण्यात आला आहे.
पृथ्वीच्याजवळ सापडलेला सर्वात पहिला लघुग्रह
अंदाजानुसार, 2023 FW13 सुमारे ६५ फूट रुंद असून तो पृथ्वीच्या दिशेने फिरतो. दरवर्षी हा लघुग्रह पृथ्वीच्या १५ दशलक्ष किलोमीटर इतका अंतर जवळ येत आहे. 2023 FW13 हा पृथ्वीच्या जवळ सापडलेला सर्वात पहिला लघुग्रह नाही. यापूर्वी २०१६ मध्ये HO3 नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ आढळून आला होता. 2023 FW13 हा लघुग्रह 100 BC पासून म्हणजेच २१०० वर्षांपासून पृथ्वीसोबत आहे. तर, किमान 3700 AD पर्यंत म्हणजेच पुढील १७०० वर्षे पृथ्वीसोबत राहील. 2023 FW13 पासून पृथ्वीला कोणताही धोका नाही, असेदेखील संशोधकांचे म्हणणे आहे.