रशियाच्या सायबेरियाच्या बर्फाळ जंगलात एक तपकिरी रंगाचे अस्वल सापडले आहे. सुमारे ३५०० वर्षांपासून हे अस्वल गोठलेल्या बर्फात मृताअवस्थेत पडून असल्याचे सांगितले जात आहे. हाडं गोठवणाऱ्या बर्फाळ जंगलात या अस्वलाचे अवशेष पूर्णपणे संरक्षित होते. शास्त्रज्ञांच्या टीमने या अस्वलाच्या मृतदेहाची तपासणी करत हा एक अनोखा शोध असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 2020 मध्ये बोल्शॉय ल्याखोव्स्की बेटावर पर्माफ्रॉस्टमध्ये रेनडिअर पाळणाऱ्यांना एक मादी अस्वलाचे अवशेष सापडले होते.

शास्त्रज्ञांसाठी हा एक अनोखा शोध

पूर्व सायबेरियातील नॉर्थ-ईस्टर्न फेडरल युनिव्हर्सिटीच्या लिव्हरेज मॅमथ संग्रहायलयातील प्रयोगशाळेचे प्रमुख मॅक्सिम चेप्रसोवा म्हणाले की, तपकिरी रंगाच्या अस्वलाच्या संपूर्ण शवाचा हा अनोखा शोध आहे.

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

हे अस्वल बोल्शॉल एथरिकॉन नदीच्या पूर्वेस आढळल्याने त्याला ‘एथ्रिकन ब्राऊन बेअर’ असे नाव देण्यात आले आहे. हे अस्वल १.५५ मीटर (५.०९ फूट) उंच आणि सुमारे ७८ किलो वजनाचे असल्याचे सांगितले जाते.

अस्वलाचे शव ३४६० वर्षे बर्फात सुरक्षित

अत्यंत थंड तापमानामुळे या अस्वलाचे मृत शरीर ३,४६० वर्षे बर्फात सुरक्षित राहू शकले, असे सांगितले जात आहे. यावर सायबेरियातील शास्त्रज्ञ चेप्रसोवा म्हणाले की, पहिल्यांदाच मऊ उती असलेले अस्लवाचे एक प्रेत शास्त्रज्ञांच्या हाती आले आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांना अस्वलाच्या अंतर्गत अवयवांचा अभ्यास करण्याची आणि मेंदूची तपासणी करण्याची संधी मिळाली आहे. सायबेरियातील शास्त्रज्ञांनी अस्वलाची शरीराची बाहेरील कडक त्वचा कापली असून ते आता त्याच्या मेंदू, विषाणूजन्य आणि अनुवांशिक घटकांचा अभ्यास करीत आहेत.

Viral Video : पर्यटक होते घाईत पण गेंड्यांनी केली हवा टाईट, जंगलात जीप झाली पलटी अन्…

हाडाला दुखापत झाल्याने अस्वलाचा मृत्यू

या अस्वलाचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे असू शकते. पाठीच्या कणक्याच्या हाडाला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. शास्त्रज्ञांच्या टीमने जेव्हा या प्राचीन अस्वलाचे विश्लेषण केले, तेव्हा अस्वलाच्या शरीरातील गुलाबी ऊती आणि पिवळी चरबी स्पष्टपणे दिसत होती.

यावर चेप्रसोवा म्हणाले की, अनुवांशिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, हे अस्वल रशियाच्या ईशान्य याकुतिया आणि चुकोटका येथील आधुनिक अस्वलांपेक्षा माइटोकॉन्ड्रियल डीएनएमध्ये वेगळे नाही.

मात्र हे अस्वल मुख्य भूमीपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेटावर कसे पोहोचले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे अस्वल बर्फ ओलांडून किंवा बेटावर पोहत गेला असावा असा अंदाज आहे. याशिवाय हे बेट त्यावेळी मुख्य भूभागाशी जोडले गेल्याने ते अस्वल त्याठिकाणी पोहचले असेल असा असा अंदाज आहे.

ल्याखोव्स्की बेटावर जगातील सर्वात मौल्यवान पॅलेओलिथिक खजिना आहेत, जे शास्त्रज्ञ आणि हस्तिदंत शिकारींना लोकरी मॅमथ्सची शिकार करण्यासाठी आकर्षित करतात.