Scooter caught fire: सोशल मीडियावर अनेकदा अशा गोष्टी व्हायरल होतात, जे पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. आजकाल कोण काय करेल याचा काही नेम नाही. अगदी कठीण प्रसंगातदेखील माणसं वेगळ्याच युक्त्या शोधतात आणि मग त्याचे व्हिडीओ असे व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही. या व्हिडीओत स्कूटरने पेट घेताच चालकाने काय केलं ते पाहा…

आग विझवण्यासाठी हे काय केलं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हिडीओमध्ये एक तरुण स्कूटरवरून इच्छित स्थळी जात असतानाच त्याच्या चालत्या स्कूटरला अचानक आग लागते. स्कूटरचालकाबरोबर त्याच्या मागे अजून एक व्यक्ती बसलेली असते. गाडीने पेट घेताच स्कूटरचालक क्षणाचाही विलंब न करता, स्कूटर थांबवतो आणि हुशारीनं दोघं स्कूटरवरून उतरतात. पण, स्कूटरवरून उतरल्यावर आग नेमकी कशी विझवायची हा प्रश्न उरतोच. त्यासाठी एक अनोखी कल्पना त्या दोघांना सुचते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा… असा मित्र नशिबाने भेटतो! ‘तो’ अचानक छतावरून खाली कोसळला अन्…, वाचवण्यासाठी मित्राने केली धडपड, पाहा थक्क करणारा VIDEO

स्कूटर थांबवून चक्क त्यातला एक माणूस आपल्या पँटची चेन उघडतो आणि त्या आगीवर लघवी करू लागतो. एवढं करूनही आग विझत नाही म्हटल्यावर स्कूटरचालकही त्याला सामील होतो आणि तोही तिथे लघवी करू लागतो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ @gdogkk या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “भाईने अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल किया है” अशी कॅप्शन त्याला दिली आहे. तसंच “फायर ब्रिगेड आती तब तक बहोत देर हो जाती” असंही या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तर या व्हिडीओला तब्बल १.५ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… काय भारी नाचलाय नवरदेव! वराचा ‘असा’ डान्स पाहून तुम्हीही व्हाल फिदा, VIDEO पाहून कराल कौतुक

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “जर टाकी फुटली असती, तर काय झालं असतं.” तर दुसऱ्यानं, “आता तर अग्निशमन दलाचं काहीच काम नाही,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “कृपया अशा प्रकारचा स्टंट पुन्हा करू नका.”

Story img Loader