‘लेडी पुष्पा, मैं हटेगी नहीं’ स्कूटीवर स्वार महिलेचा भन्नाट Video सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत १५७ हजार लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

funny video
(फोटो: memecentral.teb / Insatgram)

Viral Video: रस्ते अपघात आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करण्यासंबंधीचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. काही व्हिडीओमध्ये, लोकांची बेफिकीरता त्यांच्यावर तसेच इतर गोष्टींवर पडदा टाकत असल्याचे दिसते, तर काही नियम मोडताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बस अचानक एका स्कूटीवरून जात असलेल्या महिलेच्या समोर येते. या दरम्यान, काही काळासाठी दोघेही मागे हटण्यास तयार नाहीत. हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यावर सोशल मीडिया वापरकर्ते कमेंट करताना थकत नाहीयेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सर्वप्रथम एक स्कूटीवर स्वार महिला रस्त्यावरून जाताना दिसत आहे, तेव्हा अचानक तिच्या समोर एक बस येऊन थांबते. यादरम्यान दोघेही एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत, कारण दोघेही कोण मागे हटणार याची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, महिला आपल्या जागेवरून हटत नाही, त्यानंतर चुकीच्या बाजूने घुसलेल्या बसला शेवटी मागे जावे लागते.

(हे ही वाचा: अ‍ॅटिट्यूड दाखवत रस्त्यावरून चालत होती मुलगी आणि पुढे…; बघा हा viral video)

(हे ही वाचा: …अन् बुट काढून सलमान खानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला केलं अभिवादन; महाराष्ट्रभरात Video चर्चेत)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ अनेक लोकांनी पहिला आहे आणि व्हिडीओ शेअरही केला जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ‘memecentral.teb’ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना ‘झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए’ असं कॅप्शनमध्ये लिहिले आहे. एका यूजरने लिहिले की, ‘लेडी पुष्पा, मी हलणार नाही.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ती एक महिला आहे, ती काहीही करू शकते.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Scooty riding woman standing in front of bus this video went viral on social media ttg

Next Story
आली लहर केला कहर! प्रेयसीला तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीच केलं प्रपोज; पहा पुढे काय झालं
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी