Security Guard Dance Video : सोशल मीडियावर डान्सचे जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही डान्स व्हिडीओ हे फार मजेशीर आणि हसवणारे असतात. तर काही काळजाला भिडणारे असतात. पण, काही मोजकेच डान्स व्हिडीओ लक्षात राहतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक सुरक्षा रक्षक असा काही नाचतोय की, ते पाहून तुम्ही त्याच्या टॅलेंटचं तोंडभरून कौतुक कराल.

या व्हिडीओमध्ये एक सुरक्षा रक्षक कर्तव्यावर असताना ‘हम प्यार करने वाले, दुनिया से ना डरने वाले’ या सुपरहिट गाण्यावर नाचताना दिसत आहे. पण, नाचताना त्याचा आत्मविश्वास, हावभाव, ठुमके, पाहण्यासारखे आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका इमारतीच्या पार्किंगमध्ये एक सुरक्षा रक्षक मोठ्या उत्साहात नाचताना दिसतोय. तो कधी उभा राहू अगदी भन्नाट स्टाईलमध्ये एकेक स्टेप करतोय, तर कधी बसून हटके एक्स्प्रेशन देतोय. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि त्याचा डान्स करतानाचा आत्मविश्वास कमालीचा आहे, ज्यामुळे हा व्हिडीओ आणखी खास बनला आहे.

सुरक्षा रक्षकाचा हा डान्स व्हिडीओ @rudra_actor_official नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेक युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. अनेकांनी म्हटलेय की, आपलं टॅलेंट आपण कुठेही आणि कशा पद्धतीनेही सिद्ध करू शकतो, काहींनी म्हटले की, असा आत्मविश्वास प्रत्येकाकडे नसतो. काहींनी असेही म्हटले की, कामाच्या गडबडीतही स्वतःला आनंदी ठेवणे आणि जीवनाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. हा व्हिडीओ सिद्ध करतो की, सोशल मीडिया फक्त मोठ्या स्टार्ससाठी नाही; तर सामान्य लोकसुद्धा आपल्या टॅलेंटद्वारे लाखो लोकांची मने जिंकू शकतात.

एका युजरने कमेंट केली की, एक नंबर डान्स भावा, मज्जा आली. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, भावा व्हायरल झालास, तु तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचतोयस. तिसऱ्या एकाने लिहिले की, एक नंबर डान्स भावा. चौथ्या एकाने लिहिले की, भावाचं टॅलेंट तर पाहा, तू खूप पुढे जाणार.