Security Guard Dance Viral Video : आजकाल सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेशीर, भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात डान्सचे अनेक व्हिडीओ असतात, पण त्यातील काही मोजकेच डान्स व्हिडीओ आपल्या लक्षात राहतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक वॉचमन काका काही तरुणींच्या घोळक्यात नाचताना दिसतायत. त्यांच्या या डान्स टॅलेंटचे आता सर्वच तोंडभरुन कौतुक करतायत.
व्हिडीओत पाहू शकता, एका सोसायटीच्या मोकळ्या जागेत काही तरुणींचा एक ग्रुप रील शूट करण्यासाठी उभ्या होत्या, गाणं सुरु होताच त्या ‘बेबी डॉल’ गाण्यावर नाचू लागतात. यावेळी त्यांच्याबाजूला एक वॉचमन काका उभे असल्याचे दिसतायत. तेही काही क्षणात तरुणींबरोबर ताल धरु लागतात. नाचताना काकांचे हावभाव, टायमिंग आणि उत्साह पाहण्यासारखा आहे. जणू काही ते खूप प्रॅक्टिस करुन आल्यासारखे नाचत होते.
व्हिडीओतील आकर्षणाची गोष्ट म्हणजे वॉचमन काका आत्मविश्वासाने, निर्भीडपणे नाचत होते.त्यांच्या हावभावांनी वातावरण अगदी आनंददायी बनले होते. सुरुवातीला त्या तरुणी स्वत:च नाचण्यात मग्न होत्या पण ते काका सहभागी होताच त्याही अजून उत्साहाने नाचू लागतात.
डान्सचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात वॉचमन काकांच्या डान्सचे सर्वांनीच कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले की, हे खूप छान आहे. दुसऱ्याने लिहिले की, काका तुम्ही का अप्रतिम नाचलात. तर अनेकांनी म्हटले की, काकांनी फक्त त्यांच्या डान्समध्ये सहभागचं घेतला नाही तर आपल्या स्टाईलने सर्वांची मनं जिंकली.
