सौदी अरबमधील दुबईमध्ये शूट करण्यात आलेली अमीरात एअरलाइन्सची एक जाहिरात सध्या सोशल नेटवर्किंगवर धुमाकूळ घालत आहे. मागील वर्षी जगातील सर्वात उंच इमारतीवर चढलेली एअर होस्टेस पुन्हा एकदा याच इमारतीवर चढलीय. मात्र यावेळेस अमीरात एअरलाइन्सच्या जाहिरातीसाठी या एअर होस्टेसने अधिक धोका पत्कारल्याचं दिसत आहे.

प्रोफेश्नल स्कायडायव्हर असणाऱ्या निकोल स्मिथ-लुडविक एअर होस्टेसचे कपडे परिधान करुन दुबईमधील दोन हजार ७२२ फूट उंच बुर्ज खलीफावर चढली. तिच्या मागून अमीरात कंपनीच्या मालकीचं ए ३८० एअरबस हे अवाढव्य विमान जाताना या व्हिडीओत दिसत आहे. हे जगातील सर्वात मोठं प्रवासी विमान आहे.

Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
Boeing Investment In India
हवेतच विमानाचा दरवाजा निखळला; बोइंग मॅक्स कंपनीची विमानं का होतात दुर्घटनाग्रस्त?
Kia adds two new automatic variants
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Kia ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे आणले २ नवे व्हेरिएंट, किंमत…

या जाहिरातीसाठी कंपनीने विमानावर विशेष पेटींग करुन घेतलं होतं. ए ३८० हे विमान व्हिडीओमध्ये बुर्ज खलिफावर उभ्या असणाऱ्या निकोलच्या मागून उडताना दिसत आहे. दुबई एक्सपो २०२० ची जाहिरात या माध्यमातून करण्यात आलीय. ही जाहिरात शूट करण्यासाठी या जगातील सर्वात मोठ्या विमानाने तब्बल ११ वेळा बुर्ज खलिफाला फेऱ्या मारल्या. या वेळेस विमानाची गती १४५ समुद्री मैल इतकी होती.

नक्की पाहा >> शिकारीचा ‘हा’ ५७ सेकंदांचा Video पाहून आव्हाडही झाले थक्क; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “Amazing Hunting”

व्हिडीओमध्ये बुर्ज खलिफावर उभी असणारी निकोल हातामध्ये काही पाट्या घेऊन उभी असल्याचं दिसतं. “मी अजूनही इथे वरच आहे,” असं पहिल्या पाटीवर लिहिलं आहे. तर दुसऱ्या पाटीवर, “शेवटी, माझे मित्र येथे पोहचलेच,” असं लिहिलं आहे. त्यानंतर लगेच निकोलच्या मागून एक मोठं विमान जाताना दिसतं. हे विमान आणि बुर्ज खालीफामध्ये अवघ्या काही मीटरचं अंतर आहे. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर काही वेळातच या व्हिडीओच्या मेकिंगचा व्हिडिओही युट्यूबवर अपलोड करण्यात आलाय.

नक्की पाहा >> Video: चार जणांचं कुटुंब प्रवास करत असणाऱ्या कारला हत्तीची धडक; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

विमान इमारतीपासून अर्धा मैल दूर उडतं होतं. मात्र कॅमेरा वर्कमुळे ते अगदी निकोलच्या मागून गेल्याचा भास होत आहे. हा व्हिडीओ १५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय.

हा स्टंट ज्या जाहिरातीसाठी करण्यात आलेला तो दुबई एक्सपो २०२० चा कार्यक्रम ऑक्टोबर २०२१ पासून सुरु झाला असून ३१ मार्च २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये १९२ देशांचा सहभाग असतो. आपल्याकडील तंत्रज्ञान आणि संशोधन दाखवण्यासाठी देश या जागतिक प्लॅटफॉर्मचा वापर करतात.