विकासाच्या वेगात माणसाने निसर्गाचे खूप नुकसान केले आहे. अशा स्थितीत जंगले तोडून रस्ते करण्यात आले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांना त्रास होत आहे. त्यामुळे अनेक वेळा वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसून माणसांवर हल्ला करतात. हत्तींची गणना ही जगातील सर्वांत बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते. सर्वसामान्यपणे हत्ती हे खूप शांत प्राणी असतात; परंतु त्यांना राग आल्यानंतर त्यांच्यासमोर कोणीही टिकू शकत नाही. त्यामुळेच जंगलाचा राजा सिंहदेखील हत्तीपासून योग्य अंतर राखून असतो. सोशल मीडियावर हत्तींशी संबंधित अनेक धक्कादायक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हत्तींचे निरनिराळे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. मात्र, सध्या जो व्हिडीओ समोर आला आहे, तो हैराण करणारा आहे. जंगलामध्ये एकापेक्षा एक भयंकर प्राणी असतात. त्यामुळे जंगलातून जाताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कधी कोणता प्राणी संतापेल, प्राण्यांना कशाचा राग येईल, सांगता येत नाही. आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला. त्यात जंगलातून जाणाऱ्या गाड्या पाहून हत्तीला राग आला. मग गजराज रस्त्याच्या मधोमध पोहोचला. हे पाहून गाड्यांच्या आत बसलेल्या लोकांमध्ये आरडाओरडा झाला. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आला आहे. गाड्या पाहून हत्ती रस्त्याच्या मधोमध आला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक रस्ता जंगलातून जात असल्याचे दिसत आहे. अनेक गाड्याही रस्त्यावर वेगाने धावत आहेत. दरम्यान, एक हत्ती रस्त्याच्या मधोमध येतो. हत्तीला पाहून कारचालक आपली वाहने इकडे तिकडे थांबवतात आणि हत्ती जाण्याची वाट पाहू लागतात. पण, गजराज तिथून निघायलाच तयार नाही आणि इतक्यात हत्तीला राग येतो आणि तो पटकन गाडीकडे जातो. हे पाहून कारमधील सर्व जण किंचाळू लागतात आणि पटकन गाडीतून बाहेर पडतात. (हे ही वाचा : कंगाल पाकिस्तानात मारुतीची अल्टो कार चालविण्याची ही कोणती पद्धत? VIDEO आला समोर, नेटकरी म्हणाले, “अपघात…”) लोकांनी पळून वाचवले जीव व्हिडीओमध्ये पुढे दिसत आहे की, कारमधून खाली उतरल्यानंतर सर्व जण जंगलाच्या दिशेने धावतात. यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या इतर कारमधील लोकही मोठ्याने ओरडताना ऐकू येत आहेत. पण कारस्वार गाडीतून उतरताच हत्ती थांबतो आणि मागे वळतो; पण गाडीतील सर्व लोक घाबरतात आणि जंगलात जातात. हत्ती बराच वेळ रस्त्यावर उभा असल्याचे पाहून तेथे उपस्थित लोक आणखीनच घाबरले. पण, चांगली गोष्ट म्हणजे हत्तीचा राग काही वेळातच शांत झाला आणि तो गाडीवर हल्ला न करता, जंगलाच्या दिशेने निघून गेला. त्यामुळे लोकांचे प्राण वाचले; नाही तर त्याने हल्ला केला असता, तर अनेकांना जीव गमवावा लागला असता. येथे पाहा व्हिडीओ