scorecardresearch

VIRAL VIDEO : ही दोस्ती तुटायची नाय…; पाहा माकड आणि पक्ष्यांची अनोखी मैत्री

एका अनोख्या मैत्रीचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. माकड आणि इवल्याशा पक्ष्यांशीची ही अनोखी मैत्री पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल.

Monkey-bird-friendship
(Photo: Twitter/ AmazingNature00 )

मैत्रीला बंधन नसतं. ती कधीही कोणाशीही होऊ शकते असं म्हणतात. याचे दाखले आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहतो. या ठिकाणी आपल्याला माणसांचीच नव्हे तर प्राण्यांची मैत्री देखील पाहायला मिळते. अशा एका अनोख्या मैत्रीचा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. माकड आणि इवल्याशा पक्ष्यांशीची ही अनोखी मैत्री पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही प्रेम आणि भावना समजतात. तुमच्या आमच्यासारखी मैत्रीही करतात आणि ठेवतातही. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका माकडाचे पिल्लू अनेक पक्ष्यांवर प्रेम करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये माकड इतर पक्ष्यांशी कसं भावनिक रीतीने जोडलेले आहे, हे पाहायला मिळते. या व्हिडीओमध्ये माकड आणि पक्ष्यांमधली बॉण्डिंग पाहण्यासारखी आहे. माकडाने अतिशय प्रेमाने पक्ष्यांच्या पिल्लांना अंगावर झोपवलेलं आहे. त्यानंतर यापुढच्या स्लाईडमध्ये माकड आणि पक्ष्यांसोबत मैदानावर खेळताना बागडताना दिसून येत आहेत. माकड मैदानावर झोपलेलं असताना पक्षी त्याच्या अवतीभवती दिसून येत आहेत. या व्हिडीओमधले गोंडस माकड आणि पक्ष्यांची पिल्ले पाहून हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर तो वारंवार पाहण्याचा मोह आवरता येत नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरीला पाहून नवरदेवाला बसला जोर का झटका, समोर येऊन केलं असं काही…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पुन्हा परत येणार का डायनासोर? हा VIRAL VIDEO खरा की खोटा यावर चर्चेला उधाण

लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत. AmazingNature00 नावाच्या युजर हँडलने हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेक लोकांच्या कमेंट्सही या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल की हे प्राणी खरोखरच गोंडस आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-04-2022 at 17:32 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या