आपण सापाला नेहमी सरपटताना पाहिले आहे. पण तुम्ही कधी सापाला चालताना पाहिले आहे का? नाही ना? जर तुम्हाला कोणी सांगितले की साप चालूही शकतात, तर तुम्हाला काय वाटेल? तुमचा या गोष्टीवर विश्वास न बसणे साहजिक आहे, कारण सापाला पायच नसतात. मात्र एक इंजिनियर आणि युट्युबरने सापाला चालण्यास मदत केली आहे. साप चालतानाचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे.

मूळ इंजिनिअर असलेल्या अ‍ॅलन पॅनने सापांच्या मदतीसाठी रोबोटिक पाय तयार केला आहे. त्याने यूट्यूबवर रोबोटिक लेगच्या मदतीने साप चालवल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. व्हिडीओमध्ये युट्युबरने तो सर्पप्रेमी असल्याचे म्हटले आहे. अ‍ॅलन पॅन म्हणतो की, आधी सापांनाही पाय होते, पण कालांतराने त्यांचे पाय लहान झाले आणि गायब झाले. मी रोबोटिक पाय बनवून सापांना त्यांचे पाय परत दिले आहेत.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
farmer suicide, documentry farmer suicide
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…
drinking warm water
तुम्ही दररोज आठ ग्लास गरम पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी

“अरे बहुत जगह हैं”चं फीमेल व्हर्जन सोशल मीडियावर होतंय व्हायरल; Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

व्हिडीओला आतापर्यंत २.८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि १.३४ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सनी व्हिडीओवर आश्चर्यकारक कमेंट्स केल्या आहेत, तर काहींनी सापांना पाय नसल्याबद्दल लिहिले आहे.

अ‍ॅलन पॅनने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, सापांना पाय असत. नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालानुसार, अवयवांचा विकास ठरवणारे जनुक सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये अजूनही आहे. व्हिडीओमध्ये, तो पाय असलेल्या इतर जलचर प्राण्यांबद्दल बोलतो आणि त्याला सापाचे पाय डिझाइन करण्याची प्रेरणा कुठून मिळाली हेही स्पष्ट करतो.

“मला कंटाळा आलाय ग अभ्यास करून”; वैतागलेल्या चिमुरडीचा क्युट Video सोशल मीडियावर Viral

महाराष्ट्राची पोरं हुशार! ६ हजार मीटरवर फडकवला तिरंगा; डोंबिवलीतील दोघांसह पुणे, कर्जतच्या तरुणांचाही समावेश

व्हिडीओमध्ये, अ‍ॅलन पॅन चार पाय आणि ट्यूब यांच्या मदतीने सापासाठी रोबोटिक साचा बनवताना दिसत आहे. हा रोबोटिक साचा तो आपल्या लॅपटॉपला जोडून चालवतो. यानंतर तो साप हाताळणाऱ्याकडे जातो आणि त्याच्याकडून साप घेतो. सुरुवातीला साप या ट्यूबमध्ये जायला घाबरतो. अनेकवेळा प्रयत्न केल्यानंतर, साप ट्यूबमध्ये जातो, त्यानंतर रोबोटिक पाय चालू लागतात आणि साप न सरपटता या पायांच्या मदतीने चालू लागतो.