Cyclone Tauktae: महिलेला पावसात झाडू मारतांना पाहून आनंद महिंद्रा म्हणाले…

सोमवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून यामध्ये अनेकांचे नुकसान होत आहे. तरी देखील काहीजण आपल्या कर्तव्यावर ठाम आहेत.

कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावत असलेलं तौते चक्रीवादळ संथगतीने गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकू लागलं आहे. सध्या हे वादळ मुंबईपासून १२० किमी अंतरावर समुद्रात असून, याचा प्रचंड फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गनंतर रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही सोमवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असून, पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये वादळाच्या तडाख्यात सापडणाऱ्या भागांतून तब्बल एक लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे.

दरम्यान एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या वादळात एक सफाई कामगार महिला काम करत आहे. हा व्हिडीओ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून आनंद महिद्रांनी ट्विटरवर रिशेअर केला आहे. आनंद महिद्रांनी व्हिडीओसोबत कॅप्शन देखील लिहले आहे. त्यांनी कॅप्शनमधून बीएमसीला विनंती केली आहे.

आनंद महिद्रां म्हणाले, “या महिलेचे काम प्रेरणादायी आहे. माझी बीएमसीला एक विनंती आहे, की सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोट दिलाच असेल, परंतू पुन्हा एकदा त्यांच्याकडे तो आहे की नाही हे एकदा सुनिश्चित करावे, असे म्हटले आहे.”

Cyclone Tauktae Photos : मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोमवारी पोस्ट केला. त्यासोबत त्याने लिहले आहे की, “त्यांचा सन्मान करा, असे प्रसंग मला किती अधिकार आहेत याची जाणीव वरून देतात”  या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Seeing the woman sweeping in the rain anand mahindra said srk

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या