“काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” हे शब्द मागील काही दिवसांमध्ये अनेकदा तुमच्या कानावर पडले असतील किंवा एखाद्या मिस्मसच्या पेजवर वाचनात आले असतील. एकीकडे राज्यामध्ये शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यापासून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील याच शब्दांमुळे चर्चेत आले आहेत. शहाजीबापू पाटील यांचे व्हायरल ऑडिओमधील हे शब्द सध्या तुफान व्हायरल होत आहेत. शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल” वाक्याची सध्या इतकी चर्चा आहे की यावरुन चक्क गाणीही तयार करण्यात आली आहेत. पण या ‘झाडी, डोंगार, हाटील’वालं वाक्य नेमकं शहाजीबापू यांना सुचलं कसं यामागील गोष्ट त्यांनीच बंडखोर आमदारांसमोर बोलताना सांगितलं. बरं या वाक्याने जितका धुमाकळ घातलाय तितकाच हास्यकल्लोळ हा किस्सा ऐकताना आमदारांनी केल्याचं पहायला मिळालं. 

नक्की पाहा >> Video: “पवारांसोबत गेलो तर…”, ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदाराची तुफान फटकेबाजी; एकनाथ शिंदेंनाही हसू अनावर

गुवाहाटीमधील हॉटेल ‘रेडिसन्स ब्लू’मध्ये बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेले आमदार वास्तव्यास असून याच ठिकाणी सर्व सहकाऱ्यांसमोर बोलताना शाहाजीबापू पाटील यांनी हा व्हायरल झालेला डायलॉग मारला तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे सांगितलंय. हा किस्सा ऐकतानाही समोर बसलेले आमदार अगदी खुर्च्यांवरुन उठून उठून हसतानाचं चित्र यावेळी दिसलं. काय घडलं हे अगदी आपल्या खास सांगोला स्टाइल सांगताना शहाजीबापू म्हणाले, “साहेबांनी सांगितलं फोन स्वीच ऑफ ठेवा. तसा फोन स्वीच ऑफ ठेवला. इथं आल्यानंतर काही आमदारांना असं फोनवर बोलताना पाहिलं. तेव्हा म्हटलं, आयला आपण बी बोलू.”

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
minister chhagan bhujbal on lok sabha polls
“नाशिकमधून महायुतीतर्फे तुम्ही उभे राहा, असे मला सांगण्यात आले,” छगन भुजबळ यांची माहिती; म्हणाले, “आता उमेदवारीचा मुद्दा…”
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

नक्की वाचा >> ‘काय झाडी… काय डोंगार… काय हाटील…’ने सोडवली पुणेकरांची मोठी समस्या; ही शक्कल पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय आयडीया…’

शहाजीबापू यांनी गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये पोहोचल्यावर फोन स्वीच ऑन केला तेव्हा ते त्यांच्या हॉटेलच्या रुममध्ये होते. फोन स्वीच ऑन केल्यावर त्यांच्या सांगोल्यातील एका खास साथीदाराचा त्यांना फोन आला. हा किस्सा सांगताना “पडदा उघडा होता खिडकीचा. माझ्या खोलीतून सगळं डोंगार, बिंगार सगळं चांगलं दिसतं,” अशा एकदम गावरान भाषेत त्यांनी हा किस्सा ऐकवला तसे सर्व उपस्थित आमदार हसू लागले. अगदी समोर बसलेल्या एकनाथ शिंदेंनाही हे वर्णन ऐकून हसू फुटलं.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये असणारा ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदार म्हणतो, “फडणवीसांच्या नावाने…”

“तिकडून माझा अगदी खरा साथीदार, रफीक होता फोनवर. तो तिकडून म्हणतोय काय दोन-चार दिवस फोन नाय, काय नाय. त्यानं कुठंय काय म्हणाल्यावर, मी म्हणलं, काय डोंगार… काय झाडी… काय हाटील… एकदम ओकेमध्ये आहे सगळं रफीकभाई”, अशा शब्दांमध्ये शहाजीबापूंनी या शब्दांमागील खरी प्रेरणा खिडकीतून बाहेर दिसणारा निसर्ग असल्याचं सांगितलं अन् ते ऐकून सारेच जोरजोरात हसू लागले. हा व्हिडीओ बंडखोर आमदारांनीच जारी केलाय.

दरम्यान, या भाषणामध्ये शहाजीबापू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं पहायला मिळालं.