Shahrukh Khan DDLJ And Pathan Screening Together In Iconic Maratha Mandir Mumbai Netizens Say King Always Rules | Loksatta

मुंबईच्या मराठा मंदिरात शाहरुख खानच्या पठाण आणि DDLJ ची स्क्रीनिंग एकत्र; चाहते म्हणाले “एक तिकीट…”

मुंबईच्या मराठा मंदिरात शाहरुख खानच्या पठाण आणि DDLJ ची स्क्रीनिंग एकत्र चालू आहे. यावर चाहते वेगवेगळी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Shahrukh Khan DDLJ And Pathan Screening Together In Iconic Maratha Mandir
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा पठाण चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तुफान चालत आहे. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. शिवाय या चित्रपटाचे शो सुद्धा वाढत आहेत. जिथे रात्री १२.३० नंतरही चित्रपटगृहात शो सुरू आहेत तर एक चित्रपटगृह असे देखील आहे जिथे शाहरुख खानच्या सिनेमा सोबत दिल वाले दुल्हनिया सिनेमाची स्क्रीनिंग सुरू आहे. शाहरुख खान चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. पण वर्षानुवर्षे चाहत्यांना त्याच्या चित्रपटांची क्रेझ आहे.

म्हणूनच शाहरुख खानचा सर्वात आवडणारा चित्रपट आजही मुंबई मधल्या मराठा मंदिर येथे दाखवण्यात येतो. यासोबतच तेथे पठाण देखील दाखवण्यात येत आहे. DDLJ ला २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र अजूनही हा चित्रपट चाहत्यांमध्ये आपले स्थान टिकवून आहे. हा चित्रपट १९९५ ला रिलीज झाल्यापासून मराठा मंदिर मध्ये चालत आहे. आजही भरपूर लोकं सिंगल स्क्रीन सिनेमामध्ये हा चित्रपट पाहायला येतात. आता यासोबत पठाणची स्क्रीनिंग असल्याने त्याठिकाणी गर्दी वाढली आहे.

सोशल मीडियावर चित्रपटगुह बाहेरील एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन्ही चित्रपटाचे पोस्टर दिसत आहेत. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिने मराठा मंदिर बाहेरील हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “या दोन फोटो दरम्यान..आपल्या सर्वांकडे आठवणींचा प्रवास आहे. शाहरुख खानचा प्रवास. आणि जर तुम्हाला पठाण चित्रपटाची तिकीट नाही मिळाली तर तुम्हाला माहित आहे की तुम्हाला काय बघायचे आहे”

( हे ही वाचा: ‘या’ देशात एकही साप आढळत नाही; यामागचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल)

हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच अनेक जण हे ट्विट शेअर देखील करत आहेत. तसंच चाहत्यांनी यावर कमेंट करायला देखील सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले आहे की ‘किंग ऑलवेज किंग’ तर अजून एकाने लिहिले आहे की ‘मराठा मंदिर आणि डीडीएलजे एक इमोशन आहे’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 14:58 IST
Next Story
वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यातील ‘तो’ फोटो व्हायरल होताच प्रवाशांनी व्यक्त केला संताप