shahrukh khan at Sant Tukaram Nagar Metro Station pune: बातमीचा मथळा वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असणार पण खरोखर शाहरुख पुण्यात येऊन गेलाय आणि तो सुद्धा नुकत्याच उद्घाटन झालेल्या मेट्रो स्थानकावर. आहो कशासाठी काय विचारताय चित्रपटाच्या चित्रिकरणानिमित्त त्याने पुण्याला भेट दिलेली. हे चित्रीकरण पुण्यातील असल्याच्या चर्चेवर पुणे मेट्रोकडूनच शिक्कामोर्तब करण्यात आलंय. मात्र मेट्रो प्रशासनाने फार हौसेने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर पुणेकर खास त्यांच्या पद्धतीने टोले, टोमण्यांमधून प्रतिक्रिया देत असल्याचं दिसतंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: नाही.. नाही.. हॉलिवूड चित्रपटातील दृष्यं नाहीत… हे फोटो पुण्यातले आहेत; फोटो पाहून पुणेकरही म्हणतील, “मानलं बुवा”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२ जून २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असणाऱ्या ‘जवान’ चित्रपटाच्या टायटल अनाऊन्समेंट व्हिडीओमध्ये शाहरुख एका मेट्रो स्थानकावरील बाकड्यावर बसून असल्याचं दिसत आहे. हे मेट्रो स्थानक पुण्यातील असल्याचं पुणे मेट्रोने ट्विटरवरुन सांगितलं आहे. शाहरुखवर चित्रित करण्यात आलेला मेट्रो स्थानकावरील या सीनचा छोटा व्हिडीओ पुणे मेट्रोच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलाय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: महाकाय भुयार अन् तिरंगा फडकावत Underground सेलिब्रेशन… पुण्याच्या पोटात चाललंय तरी काय?

“शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाच्या जाहिरातीत पुणे मेट्रोच्या संत तुकाराम नगर स्थानकाची ची झलक,” अशा कॅप्शनसहीत पुणे मेट्रोने हा व्हिडीओ ट्विट केलाय. तसेच पुणे मेट्रोच्या स्थानकावर चित्रित करण्यात आलेला ‘जवान’ हा पहिला चित्रपट ठरलाय.

कधी झालं चित्रीकरण?
दीड वर्षापूर्वी चित्रीकरण झाले होते. संत तुकारामनगर स्थानकाचे काम त्यावेळी पूर्ण झाले होते. दहा दिवसांसाठी स्थानक चित्रीकरणासाठी घेण्यात आले होते. त्या कालावधीत चित्रीकरण पूर्ण झाले.

पुणेकरांच्या भन्नाट कमेंट्स…
अर्थात मेट्रोच्या या ट्विटवर पुणेकरांनी या विषयाला धरुन प्रतिक्रिया देण्याबरोबरच खास पुणेकरी शैलीमध्येही काही प्रतिक्रिया दिल्यात. काहींनी शाहरुखला पुणेकर म्हणून मान देत आदराने काका, मामा तरी म्हणा, असं म्हटलंय. तर अन्य एकाने मेट्रो याच कामांसाठी वापरली जाते. नको त्या मार्गावर ही पाच किमीची मेट्रो बांधीलय अशी तक्रार नोंदवलीय. अन्य एकाने, “पुणेणे महानगरपालिका नुसते रस्ते आणि फ्लायओवर बांधत सुटली, आणि खाजगी वाहनांसाठी सोयी करत राहिली, तर मेट्रो कोण वापरेल? त्यांना आवरा आधी,” असा सल्ला मेट्रो प्रशासनाला दिलाय.

एकंदरितच या साऱ्या कमेंट्स पाहिल्यावर पुणेकरांना हे शाहरुख पुण्यात आल्यापेक्षा पुणे मेट्रोबद्दल तक्रार करण्यात आणि शाहरुखला ट्रोल करण्यात जास्त रस असल्याचं दिसून येत आहे. पुणेकरांच्या खास शैलीचा इथेही प्रत्यय आला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

शाहरुख चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर…
दरम्यान, जवान या चित्रपटात सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra), सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) देखील दिसणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडा भाषेत प्रदर्शित होणार आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेला झिरो हा चित्रपट अभिनेता म्हणून शाहरुखचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी २०२२ मध्ये ब्रम्हास्त्रमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करोनाचा कालावधी आणि आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुखने आता पुन्हा एकदा कामाकडे आपला मोर्चा वळवला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan shoot jawan movie at sant tukaram nagar metro station punekar gives funny comments scsg
First published on: 08-06-2022 at 13:35 IST