‘शेअर मार्केटची कृपा’- बदलापूरच्या गृहस्थानी ठेवलं बंगल्याचं हटके नाव, त्यामागचं कारणही आहे खास

बदलापूरच्या एका व्यक्तीने त्याच्या बंगल्याला दिलेलं हटके नावाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडीयावर या नावाची जोरदार चर्चा आहे.

share makretchi krupa
'शेअर मार्केटची कृपा' ( फोटो: @Mukund Khanore / Facebook)

देवाची कृपा, आई-वडलांची कृपा किंवा एखाद्या देवाचे नाव, मुलांची नाव सहसा घरांना दिली जातात. पण एका व्यक्तीने त्यांच्या घराला काही तरी हटके नाव दिल्याने सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरु आहे. बदलापूर येथे एका व्यक्तीने ते जे काम करतात त्यावरून त्यांच्या बंगल्याचे नाव देऊन अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बंगल्याचे हटके नाव

बदलापूरच्या या बंगल्याचे नाव आहे चक्क ‘शेअर मार्केटची कृपा’. हे नाव ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे मुकुंद खानोरे. त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या नावाची माहिती फेसबुकवर पोस्ट करून दिली. त्यांनी बंगल्याचा फोटोही पोस्ट केला आहे. त्यांनी फोटोला कॅप्शन दिलं की ‘माझा नवीन बंगला जो साकारला शेअर मार्केट च्या माध्यमातून ( मुंबई सबब ) शेअर मार्केट ची कृपा’. ४ दिवसापुर्वीच्या या पोस्टमुळे मुकुंद खानोरे चांगलेच चर्चेत आले आहेत.

( हे ही वाचा: Viral: लग्नाआधी वराला धु-धु धुतला; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल एकदम बरोबर केलं)

कोण आहेत मुकुंद खानोरे?

मुकुंद खानोरे हे शेअर बाजारात मोठ नाव आहे. ते मूळचे बदलापूरचे आहेत. आपल्या अनुभव आणि मेहनतीमुळे खानोरे हे आज शेअर बाजार क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.

( हे ही वाचा: ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांना मिळते लवकर यश, त्यांच्यावर असतो धन देवता कुबेरचा आशीर्वाद)

( हे ही वाचा: टीव्हीवर मांजरीने पक्षी पाहिल्यावर शिकारीसाठी मारली उडी, आणि…बघा Viral Video )

असं नाव का ठेवलं ?

शेअर बाजारात खूप काम करून, मेहनत करून नाव कमावल्यानंतर उउतम पैसे मिळाल्यावर मुकुंद खानोरे यांनी बदलापूरमधील कासगावमध्ये मोठा भूखंड खरेदी केला. त्याच भूखंडावर त्यांनी हा बंगला बांधला. त्यांच्या कामामुळे. शेअर मार्केटमुळेच ते हा बंगला बांधू शकले आणि म्हणूनच त्यांनी असं नाव ठेवल्याचं ते सांगतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Share makretchi krupa badlapurs recidance mukund khanore bungalow has a special name the reason behind it is special ttg

Next Story
टीव्हीवर मांजरीने पक्षी पाहिल्यावर शिकारीसाठी मारली उडी, आणि…बघा Viral Video
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी