Share Market Holiday 2026: १ जानेवारी २०२६ पासून नवीन वर्ष सुरू होत आहे आणि गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की या दिवशी शेअर बाजार खुले असतील की बंद असतील. बऱ्याच जणांना बँकांही सुरू आहेत की नाही याबाबत संभ्रम आहे. दरवर्षीप्रमाणे, नवीन वर्षाच्या दिवसाच्या बाजार सुट्टीबद्दल गोंधळ आहे. कारण बरेच लोक ती राष्ट्रीय सुट्टी मानतात, तर काहीजण तो एक सामान्य व्यापाराचा दिवस मानतात.
जर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल, व्यापार करण्याची योजना आखत असाल किंवा गुंतवणुकीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्याची वाट पाहत असाल तर बाजाराची परिस्थिती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेअर बाजाराच्या सुट्ट्या एका निश्चित कॅलेंडरवर आधारित असतात. यामध्ये राष्ट्रीय सुट्ट्या, सण आणि विशेष प्रसंग समाविष्ट असतात.
१ जानेवारी २०२६ रोजी शेअर बाजार सुरू आहे की नाही?
१ जानेवारी २०२६ रोजी शेअर बाजार इक्विटी ट्रेडिंगसाठी बंद राहणार नाही. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्ही कंपन्यांनी २०२६च्या शेअर बाजारातील सुट्टीच्या यादीत नवीन वर्षाचा दिवस इक्विटी सेगमेंटसाठी सुट्टी म्हणून समाविष्ट केलेला नाही. म्हणजेच गुंतवणूकदार गुरूवार १ जानेवारी २०२६ रोजी नेहमीप्रमाणे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतील.
कोणते विभाग खुले राहतील?
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज विभाग सामान्यपणे काम करतील. याचा अर्थ स्टॉक, फ्युचर्स ऑप्शन्स आणि सरन्सी ट्रेडिंगमध्ये कोणताही ब्रेक राहणार नाही.
कोणते विभाग बंद असतील?
१ जानेवारी २०२६ रोजी फक्त एनएसईचा कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज विभाग बंद राहील. जानेवारीतील शेअर बाजाराची पहिली पूर्ण ट्रेडिंग सुट्टी २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी असेल. या दिवशी एनएसई आणि बीएसईचे सर्व विभाग बंद राहतील.
