scorecardresearch

Shark Tank India: ८५ वर्षाच्या आजोबांनी बनवलं ‘हे’ भन्नाट तेल; एकही केस नसलेल्या डोक्याचं रुपडं ‘असं’ बदललं

Shark Tank India 2: वयाच्या ८५ व्या वर्षीसुद्धा टक्कल असलेल्या डोक्यावर केस उगवतील, असा दावा त्यांनी शार्कसमोर केला आणि मग..

Shark Tank India 2 85 year old Man makes Ayurvedic Oil For Rapid Hair Growth Check His Amazing Journey
Shark Tank India: ८५ वर्षाच्या आजोबांनी बनवलं 'हे' भन्नाट तेल (फोटो: इंस्टाग्राम)

Shark Tank India 2: ‘शार्क टँक इंडिया’चा दुसरा सिझनसुद्धा टेलिव्हिजनवर लोकप्रिय ठरतोय. आपल्या स्टार्टअप्ससाठी गुंतवणूक मिळवण्यासाठी बरेच उद्योजक या शोमध्ये हजेरी लावतात आणि यातील अनेक उद्योजकांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी हवे तसे आर्थिक पाठबळही मिळते. काही वेळा उद्योजक आपल्या कल्पनांनी तर काही वेळा आपल्या जिद्द, मेहनत व धडाडीने शार्क्ससह प्रेक्षकांना भुरळ पाडतात. अलीकडेच एका ८५ वर्षीय आजोबांनी शार्क टॅंक मध्ये आपल्या आयुर्वेदिक तेलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. क्वचितच असे होते की जिद्दीला तितक्याच कल्पक कल्पनेची जोड मिळते आणि तीच बाब या आजोबांच्या बाबत खरी झाली आहे.

शार्क टॅंक इंडियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओत आरके चौधरी यांच्या व्यवसायाची माहिती दिली आहे. आर. के. चौधरी हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत एका अशा आयुर्वेदिक तेलाची डील घेऊन शार्क्ससमोर आले होते वयाच्या ८५ व्या वर्षीसुद्धा टक्कल असलेल्या डोक्यावर केस उगवतील, असा दावा त्यांनी शार्कसमोर केला. आरके चौधरी यांच्या हेअरकेअर आणि स्किनकेअर कंपनीचं नाव Avimee Herbal असं आहे.

आरके चौधरी यांनी सांगितले की, कोविडनंतर घरात सर्वांनाच केस गळण्याची समस्या जाणून लागली होती. हे तेल बनवून त्यांनी स्वतःच्या मुलीला वापरायला दिलं. ज्यावर मुलीने उलट त्यांनाच ते तेल वापरून बघण्याचा पर्याय सुचवला. चौधरी सांगतात की, ८५ व्या वर्षी माझं डोकं म्हणजे जणू क्रिकेटचं साफ केलेलं मैदानाच झालं होतं. पण हे तेल वापरल्यापासून डोक्यावर पुन्हा केस येऊ लागले.”

आरके चौधरी यांनी आपल्या आयुर्वेदिक तेलाच्या व्यवसायात २.८ कोटी रुपयांसाठी ०.५ टक्के इक्विटीची मागणी केली. अमन गुप्ता, नमिता थापर आणि पियुश बंसल यांनी डील करण्यास नकार दिला. तर अमित जैनने १ कोटी रुपयांवर २.५ टक्के इक्विटीची ऑफर दिली. अनुपम मित्तलनेही ७० लाख रुपयांवर २ टक्के इक्विटीची ऑफर दिली.

हे ही वाचा<< Bank Of Maharashtra Recruitment 2023: २२५ रिक्त जागांची मोठी भरती; कधी, कुठे व कसा कराल अर्ज?

आरके चौधरी हे २.८ कोटी रुपयांवर १.५ टक्के इक्विटीपेक्षा कमीमध्ये डील करु इच्छित नसल्याने त्यांना मनाप्रमाणे फंडिंग मिळू शकले नाही पण त्यांच्या या कल्पनेने सर्वच थक्क झाले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 11:22 IST
ताज्या बातम्या