“भारतीयांनी Anocracy हा शब्द शिकून घ्यावा”; म्हणत थरुर यांचा भाजपाला टोला; पण अ‍ॅनॉक्रॉसीचा अर्थ काय?

पुन्हा एकदा थरुर यांनी इंग्रजीमधील एक खास शब्द वापरलाय. पण यावेळेस त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.

tharoor shashi
थरुर यांनी केलेलं ट्विट ठरतंय चर्चेचा विषय (प्रातिनिधिक फोटो)

काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे त्यांच्या इंग्रजीसाठी ओळखले जातात. जगभरातील फॉलोअर्सच्या ज्ञानामध्ये थरूर ट्विटरवरुन भर टाकत असतात. अनेकदा थरूर ट्विटरवरुन व्यक्त होताना असे काही इंग्रजी शब्द वापरतात की जे अनेकांनी पूर्वी ऐकलेले किंवा पाहिलेले नसतात.

अनेकदा थरुर यांचं इंग्रजी हे मिम्सचा विषय ठरतं. म्हणजे मध्यंतरी थरुर यांनी ‘floccinaucinihilipilification’ हा इंग्रजी शब्द एका ट्विटमध्ये वापरला होता. थांबा देवनागरीमध्ये सांगायचं झालं तर हा शब्द आहे ‘फ्लॉकीनॉकिनीहिलिपिलिफिकेशन’. लागला की नाही दम? तर या शब्दाचा अर्थ आहे, व्यर्थ गोष्टींबाबत विचार करण्याची सवय. आता पुन्हा एकदा थरुर यांनी असाच एक शब्द वापरलाय. पण तो एवढा मोठा नसला तरी नेटकऱ्यांना मात्र गोंधळात टाकणार आहे.

थरुर यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका करताना अ‍ॅनॉक्रॉसी (Anocracy) हा शब्द वापरलाय. जेव्हा एखादं सरकार लोकशाहीपद्धतीने कारभार करताना त्यामध्ये हुकुमशाही तत्वाचा समावेश करतं त्या गोष्टीला अ‍ॅनॉक्रॉसी असं म्हणतात, अशा अर्थाचं ट्विट थरुर यांनी केलंय.

हे फोटो नक्की पाहा >> Viral Memes: “एवढं इंग्रजी तर आम्ही वर्षभरात वापरत नाही”, “अमित शाहसुद्धा थरुर English पाहून गोंधळतील”

“आपण भारतात एक शब्द शिकून घेतला पाहिजे तो म्हणजे, अ‍ॅनॉक्रॉसी. हे असं सरकार असतं जे लोकशाहीला हुकुमशाहीबरोबर मिक्स करतं. ते निवडणुकीला परावनगी देतात, विरोधीपक्षाला त्यात सहभागीही होऊ देतात. त्याचवेळी अशा कालावधीत नाममात्र स्पर्धा सामावून घेणार्‍या (सरकारी) संस्था अस्तित्वात असतात. मात्र असं असलं तरी ते कशाची जबाबदारी घेत नाहीत,” असा टोला थरुर यांनी ट्विटरवरुन लागवलाय.

करोनाची तिसरी लाट असतानाही निवडणुक आयोगाने पाच राज्यांमधील निवडणुकांची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर थरुर यांनी हे ट्विट केल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

नक्की वाचा >> …त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणाचा भाजपाला आनंदच झाला असेल; शिवसेनेचा टोला

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली. या निवडणुका सात टप्प्यांत होणार असून १० फेब्रुवारी रोजी मतदानाचा पहिला, तर ७ मार्च रोजी अखेरचा टप्पा पार पडेल. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक सात टप्प्यांमध्ये, मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत तर, पंजाब, गोवा व उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात मतदान होईल. पाचही राज्यांमध्ये १० मार्च रोजी मतमोजणी होईल, असं निवडणुक आयोगाने म्हटलंय. यावरुनच हे ट्विट असल्याचं म्हटलं जातंय.

अशापद्धतीने थरुर यांनी कठीण शब्द वापरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी असे कठीण शब्द वापरले आहेत. जेव्हा जेव्हा ते असे शब्द वापरतात तेव्हा नेटकरीही फार वेळ व्यर्थ न घालवता मिम्सचा पाऊस पडताना दिसतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shashi tharoor slams bjp and his word of the day anocracy here is what it means scsg

Next Story
VIRAL VIDEO : “तू मोठा होऊन काय बनशील?” या प्रश्नावर मुलाने जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्ही पोट धरून हसाल, एकदा पाहाच
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी