YouTube च्या मदतीने तिने घरीच केली स्वत:ची प्रसूती; एकाच घरात राहून पालकांनाही कळलं नाही

१७ वर्षीय मुलीने २० ऑक्टोबर रोजी घरी यूट्यूब पाहून मुलाला जन्म दिला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर पालकांना घटनेची माहिती मिळाली.

baby-759
युट्यूबवर व्हिडीओ पाहून दिला बाळाला जन्म (फोटो : इंडियन एक्सप्रेस फाईल फोटो)

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात प्रियकराच्या कथित बलात्कारानंतर गरोदर राहिलेल्या १७ वर्षीय मुलीने घरी युट्यूब व्हिडीओ पाहिल्यानंतर मुलाला जन्म दिला. बुधवारी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बाळाच्या जन्मानंतर आई आणि बाळाला मांजरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघेही निरोगी आहेत. आश्‍चर्याची बाब म्हणजे या संपूर्ण घटनेबाबत अल्पवयीन मुलीच्या पालकांना माहिती नव्हती.

नक्की काय झालं?

पोलिसांनी सांगितले की, बलात्काराचा आरोप असलेल्या २१ वर्षीय तरुणाला लैंगिक छळापासून संरक्षण कायदा (POCSO) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत एफआयआर नोंदवून अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण जिल्ह्यातील कोट्टक्कल पोलीस ठाण्यांतर्गत आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिथे मुलीने २० ऑक्टोबर रोजी घरी यूट्यूब पाहून मुलाला जन्म दिला आणि तिची नाळ कापली.

( हे ही वाचा: त्या लाइव्ह शोमधून शोएब अख्तर अचानक बाहेर का पडला?; Video Viral झाल्यानंतर म्हणाला, “तो प्रकार…” )

पालकांना कशी माहिती मिळाली?

प्राथमिक तपासात असे दिसून आले की प्रसूतीदरम्यान तिने बाहेरून कोणाचीही मदत घेतली नाही आणि मुलीच्या पालकांना २२ ऑक्टोबर रोजी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून या घटनेची माहिती मिळाली, असे पोलिसांनी सांगितले.

( हे ही वाचा: ‘या’ पाच राशीचे लोक असतात सर्वात प्रामाणिक; कधीच कोणाला फसवत नाहीत )

काही काळापासून होते प्रेमसंबंध

पोलिसांनी सांगितले की, मुलगी १२ व्या वर्गात शिकते आणि तिने तिच्या दृष्टिहीन पालकांपासून गर्भधारणा लपवून ठेवली. त्याने सांगितले की मुलगी आणि मुलाचे होते आणि मुलगी १८ वर्षांची झाल्यावर दोघेही लग्न करण्याचा विचार करत होते. पोलिसांनी सांगितले की, मुलगी आणि तिच्या मुलाची काळजी आरोपीच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे, परंतु ती केवळ १७ वर्षांची असल्याने पोलिस याला बलात्काराचे प्रकरण मानत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: She gave birth at home with the help of youtube living in the same house even the parents did not know ttg

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या