जगभरातील आकर्षणासाठी दुबई प्रसिद्ध आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या सर्वात मोठ्या शहरात बुर्ज खलिफा आणि दीप डायव्हनंतर आता जगातील सर्वात मोठे आणि सर्वात उंच ऑब्जर्वेशन व्हील उघडण्यात आलं आहे. लंडन आयच्या जवळजवळ दुप्पट उंचीचे ऑब्जर्वेशन व्हील २५० मीटर उंचीवर नेऊन तिथून दुबईच्या चित्तथरारक दृश्याचा आनंद घेता येणार आहे. ऐन दुबई ब्लूवॅटर्स बेटावर उभारलेल्या ऑब्जर्वेशन व्हीलवर बसण्याचा आनंद नुकताच दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी लुटला. याचा एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. दुबईचे चित्तथरारक दृश्य दाखवणाऱ्या या व्हिडीओने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे.

दुबईचा क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम हा एक अॅडव्हेंचर प्रेमी आहे. दुबईमध्ये जगातल्या सर्वात उंचीवर नेऊन दुबई दर्शन घडवणारे ऑब्जर्वेशन व्हीलचं उद्घाटन पार पडलं. त्यानंतर दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी ऑब्जर्वेशन व्हीलवर बसून कॉफीचा मनमुराद आनंद घेतलाय. हा क्षण त्यांनी आपल्या कॅमेरात कैद करत दुबईचे विहंगम दृश्य चाहत्यासंबोत शेअर केली आहेत. उंचच उंच इमारती आणि श्रीमंत अशी दुबई या ऑब्जर्वेशन व्हीलवर बसून कशी दिसते हे बघायला प्रत्येकालाच आवडेल म्हणूनच या राजकुमाराने कॅमेरात कैद केलेल्या स्वप्ननगरीचा एक व्हिडीओच इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला आहे.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
9 year old deadlifting 75 kg viral video
भारतातील सर्वांत शक्तिशाली चिमुरडी! पाहा नऊ वर्षीय ‘धाकड’ मुलीचे शक्तिप्रदर्शन; Video पाहून व्हाल थक्क…
Loksatta viva Services and travel Volunteer Tourism Tourism
सफरनामा: सेवा आणि प्रवास!

या व्हिडीओमध्ये ते ऑब्जर्वेशन व्हीलवरील सर्वात वरच्या ठिकाणी बसून हातात कॉफीचा कप पकडलेले दिसून येत आहेत. अशा उंच ठिकाणी बसून कॉफीचा आनंद घेत त्यानंतर ते ऑब्जर्वेशन व्हीलवरून दिसणारं दुबईचं विहंगम दृश्य त्यांनी कॅमेऱ्यात कैद केलंय. ऑब्जर्वेशन व्हीलच्या खाली ब्लूवाटर्स द्वीपचं समुद्र, आजुबाजुला गगनाला भिडणाऱ्या उंच उंच इमारती आणि सोबत २५० मी उंचीच्या ऑब्जर्वेशन व्हीलची रचना हे सारं काही त्यांनी या व्हिडीओमधून दाखवलंय. यात कॅमेरा आडव्या तिडव्या मार्गांनी या ऑब्जर्वेशन व्हीलच्या एक एक केबीनमधून, खालून वर जणू काही समुद्रात डुबकी मारतोय, यावरून प्रेक्षकांना व्हीलच्या वरच्या उंचीचा अनुभव येतो. २५० मीटरवरून ऐन दुबई कशी दिसते हे जाणून घेण्यासाठी प्रिन्स शेख हमदानचा धाडसी व्हिडिओ पाहिलाच पाहिजे….

दुबईचं विहंगम दृश्य दाखवणाऱ्या प्रिन्स शेख हमदान यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओला नेटकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसून येतेय. या व्हिडीओला आतापर्यंत ९ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलंय.

ऐन दुबई व्हील तिकिटे
ऑब्जर्वेशन व्हीलवर प्रौढांसाठी Dh130 आणि 3 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी Dh100 इतकी किंमत घेतली जात आहे. या आठवड्याच्या शेवटी नागरिकांना अनेक रोमांचक दृश्ये दाखवण्यात येणार आहेत. यावर तुम्हाला लाइव्ह परफॉर्मन्स, फूड ट्रक आणि अर्थातच भव्य दृश्ये पहायला मिळतील.