“राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी रामदेव बाबांचे शिष्य, तरीही…”; अध्यात्मिक गुरुंनी लगावला टोला

राज कुंद्रांना अकराच्या आसपास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ११ वाजून ५४ मिनिटांनी कुंद्रांना पॉर्न चित्रपट निर्मितीसंदर्भात अटक झाल्यावरुन टोला लगावला

Raj Kundra Raj Kundra Arrest
सोमवारी रात्री अकराच्या सुमारास राज कुंद्रा यांना अटक झाल्यानंतर केलं ट्विट

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यवसायिक राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपांखाली मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुंद्रा यांना रात्री अकराच्या सुमारास ताब्यात घेतलं. फेब्रुवारीमध्ये मढ परिसरातील एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात अश्लील चित्रपट बनविणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली होती. याच प्रकरणामध्ये कुंद्रा प्रमुख आरोपी असून त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याने अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अचानक अटक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर याचसंदर्भातील चर्चा पहायला मिळाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांचं नाव ट्विटरच्या टॉप ट्रेण्डमध्ये दिसू लागली. विशेष म्हणजे अनेकांनी राज कुंद्रा हे पुन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाच यंदा थेट पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज यांना अटक झाल्याने सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी अनेक प्रकारचे ट्विट शेअर केले. काहींनी हे धक्कादायक असल्याचं सांगितलं तर काहींनी यावरही मिम्स बनवले. असं असतानाच एका अध्यात्मिक गुरुंनी बाबा रामदेव यांचा संदर्भ देत राज कुंद्रांना टोला लगावलाय.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

आचार्य प्रमोद यांनी आपल्या व्हेरिफाइड ट्विटर हॅण्डलवरुन सोमवारी रात्री एक ट्विट केलं असून ते सध्या व्हायरल झालं आहे. राज कुंद्रांना अकराच्या आसपास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आचार्य प्रमोद यांनी ११ वाजून ५४ मिनिटांनी कुंद्रांना पॉर्न चित्रपट निर्मितीसंदर्भात अटक झाल्यावरुन खोचक टोला लगावला. “शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा बाबा रामदेव यांचे शिष्य आहेत. ध्यान, योग, साधना त्यांना (शिल्पा आणि राज यांना) त्यांनीच (बाबा रामदेव) शिकवली आहे. तरीही त्याचं धान्य (लक्ष्य) विचलित झालं,” असं आचार्य प्रमोद म्हणालेत. एक हजारहून अधिक वेळा त्याचं ट्विट रिट्विट करण्यात आलं असून आठ हजारहून अधिक जणांनी ते लाईक केलं आहे.

Tweet By Acharya Pramod

नक्की वाचा >> “Porn Vs Prostitution वर बोलूयात, कॅमेरासमोरच्या सेक्ससाठी…”; राज कुंद्रांचं ‘ते’ ट्विट व्हायरल

गुगलवरही राज कुंद्रांचीच चर्चा

दरम्यान, राज कुंद्रा यांना अटक झाल्यानंतर गुगलवरही कुंद्रा यांच्यासंदर्भातील सर्च वाढल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे Movies Made By Raj Kundra हा सर्च करण्यामध्ये महाराष्ट्र हा देशात आघाडीवर असल्याचं चित्र गुगल ट्रेण्ड्समध्ये दिसून आलं. गुगल ट्रेण्डमधील आकडेवारीसंदर्भात बोलायचं झाल्यास पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्रा यांना अटक केल्याची बातमी सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास समोर आल्यानंतर काही तासांमध्येच राज कुंद्रा यांनी बनवलेले चित्रपट कोणते आहेत हे पाहण्यासाठी नेटकऱ्यांनी गुगलकडे धाव घेतली.

नक्की वाचा >> राज कुंद्रा गुन्हेगारी प्रकरणांची यादी : इक्बाल मिर्ची, बिटकॉईन घोटाळा, IPL सट्टेबाजी ते Porn App प्रकरण…

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये Movies Made By Raj Kundra या टर्मबद्दलचा सर्च वाढल्याचं दिसून आलं. इतकचं नाही तर यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचंही गुगल ट्रेण्डमध्ये दिसत आहे. राज कुंद्रा न्यूज हा सुद्धा या सर्चसंदर्भातील रिलेटेड सर्च होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shilpa shetty husband raj kundra arrested acharya pramod tweet scsg