Viral Video: आई-वडिलांच्या सानिध्यात जाते तेच खरे बालपण असते. पण, कित्येक बालकांच्या नशिबी असे बालपण येतच नाही. काही मुलं रस्त्याच्या कोपऱ्यावर, कचराकुंडीजवळ फेकून दिली जातात. तसेच काही मुलांना कुटुंबातील वैयक्तिक कारणांमुळेही अनाथाश्रमात ठेवले जाते. तेथे त्यांचे शिक्षण, जेवणाची सोय, त्यांच्या संगोपनाची काळजी घेतली जाते. तर अनाथाश्रमातील लोकांबरोबर या मुलांचे सुद्धा वेगळे नाते तयार होते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.तरुणीने १८ वर्षांपूर्वी अनाथाश्रमात संगोपन करणाऱ्या महिलेला भेट दिली आहे…

ही गोष्ट शिवानी शुल्झ या भारतीय वंशाच्या महिलेची आहे. तिला लहानपणी दिल्लीच्या एका अनाथाश्रमात ठेवण्यात आलं होत. तिथे शिवानी आणि तिच्या धाकट्या भावाला एक महिला सांभाळायची. तर शिक्षण आणि लग्नानंतर आज १८ वर्षांपूर्वी संगोपन करणाऱ्या महिलेला शिवानी स्वतःच्या पती आणि मुलीसह अनाथाश्रमाला भेट देण्यास आली आहे. आश्रमाला भेट दिल्यावर ती सगळ्यात पहिला तिला आणि तिच्या भावाला सांभाळणाऱ्या महिलेला भेटते. एवढ्या वर्षांनी आई सारखं सांभाळ करणाऱ्या महिलेला भेटून शिवणीच्याही अश्रूंचा बांध फुटला. तुम्हीसुद्धा पाहा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ.

हेही वाचा…एक, दोन नव्हे तर चक्क ‘इतक्या’ जणांना नेलं दुचाकीवरून; VIDEO झाला व्हायरल अन्… पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओनुसार शिवनीचे वडील तिच्या आईला मारहाण करायचे. म्हणून त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यानंतर एकेदिवशी वडिलांना भेटायला जात असताना शिवनी आणि तिचा भाऊ एका रेल्वे स्टेशनवर हरवले. तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने दोघांनाही अनाथाश्रमात नेले. एका आठवड्यानंतर त्यांनी दोघांना दिल्लीच्या अनाथाश्रमात स्थलांतरित केले. नंतर दोन्ही मुलांना तीन वर्षांनंतर एका कुटुंबाने दत्तक घेतले. तेव्हा शिवानी अवघ्या सहा वर्षांची होती. तेव्हापासून व्हिडीओतील महिलेनं दोघांचेही संगोपन केले.

सुरवातीला शिवानीला अनाथाश्रमात भयानक अत्याचाराचा सामना कसा करावा लागला. पण, एका महिलेनं तिची आणि तिच्या भावाची तीन वर्ष योग्य ती काळजी घेतली. त्यानंतर काही वर्षांनी शिवनीचे लग्न झाले. त्यामुळे १८ वर्षानंतर तिने या महिलेला भेटण्याचे ठरवले. त्या क्षणी शिवानीला असे वाटले की, ती तिच्या जन्मदात्या आईकडे पाहते आहे. हा व्हिडीओ पाहून आणि ही गोष्ट ऐकून तुमच्याही डोळ्यात चटकन पाणी येईल एवढं नक्की. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shiv_schulz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.