scorecardresearch

तिने एक डोळा मारला अन.. सेलिब्रिटींना टाकलं मागे; पहा नाशिकच्या लिटिल स्टारचे Viral Video

तुझी माझी रेशीमगाठ मधील परी म्हणजेच मायरा वायकुळ हे नाव आज जगात पोहोचलंय. पण अशा प्रकारे सोशल मीडियावरून चर्चेत आलेली परी एकटीच नाही तर आता नाशिकची एक चिमुकली सुद्धा खूप चर्चेत आहे.

तिने एक डोळा मारला अन.. सेलिब्रिटींना टाकलं मागे; पहा नाशिकच्या लिटिल स्टारचे Viral Video
(फोटो: इंस्टाग्राम/ @ShivanjaliPorje)

सोशल मीडियाने आज अनेकांच्या आयुष्यात आपली जादू दाखवून दिली आहे. कधी ऐंशी वर्षाच्या आजींचे भरतनाट्यमचे व्हिडीओ तर कधी अवघ्या वर्षभराच्या बाळाचे नटखट अंदाज हे सगळं काही इंस्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून जगासमोर येत आहे. अलीकडे अनेक पालक आपल्या लहानग्यांना अ..आ..ई सोबत इन्स्टा रील्सचे पण धडे देत आहेत. अनेक लहान मुलांचे इंस्टाग्राम अकाउंट्स असून त्यावर लाखोंमध्ये फॉलोवर्स संख्या आहेत. उदाहरण पाहायचं तर, तुझी माझी रेशीमगाठ मधील परी म्हणजेच मायरा वायकुळ हे नाव आज जगात पोहोचलंय. पण अशा प्रकारे सोशल मीडियावरून चर्चेत आलेली परी एकटीच नाही तर आता नाशिकची एक चिमुकली सुद्धा खूप चर्चेत आहे.

नाशिकच्या या रीलस्टारचं नाव आहे शिवांजली पोरजे, अवघ्या १० वर्षाच्या शिवांजलीचे इंस्टाग्राम वर ४ मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिच्या प्रत्येक व्हिडिओला मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटची रिच अनेक सेलिब्रिटींना सुद्धा मागे टाकेल अशी आहे.

शिवांजली पोरजे हिने काही दिवसांपूर्वी विंक क्रॅश गाण्यावर बनवलेल्या काही सेकंदाच्या रीलला चक्क २५८ मिलियनहुन अधिक व्ह्यूज होते. या व्हिडीओने चक्क जगप्रसिद्ध इंस्टाग्रामर खाबीला मागे टाकले होते.

नाशिक मध्ये शेवगेडांग सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे. करोना काळात म्हणजेच लॉकडाऊन मध्ये तिच्या मोठ्या भावांसोबत मजेशीर व्हिडीओ बनवत होती. सुरुवातीला आई वडिलांना याबाबत काही कल्पना नसताना त्यांनी बनवलेल्या व्हिडिओला चक्क ३३ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. जे पाहून अनेक अभिनेत्रींना तिला फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या.

आजवर छगन भुजबळांसह अनेक राजकारण्यांनी सुद्धा शिवांजलीचे तोंडभरून कौतुक केले आहे.

शिवांजलीने झी मराठी वरील कारभारी लै भारी मालिकेत केलेली भूमिका अजूनही अनेकांच्या लक्षात आहे.

Video: भेळपुरी विकताना मोबाईल सुरु केला अन.. सेकंदात व्हिडिओ Viral झाला, तुम्हीच पहा

दरम्यान शिवांजली हे सर्व छंद आपला अभ्यास जपून करते. अलीकडे अनेक मेकअप आर्टिस्ट व ब्रँड्सने सुद्धा तिच्यासोबत मिळून व्हिडीओज बनवले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या