Shocking video: लोकांना पाळीव प्राणी खूप आवडतात. बरेच लोक त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसारखे वागवतात. हे सदैव त्यांच्यासोबत असतो. तसेच त्यांच्यासोबत फिरायला जातात. या पाळीव प्राण्यांमध्ये पहिला नंबर येतो कुत्र्याचा. कुत्र्यांच्या अनेक जाती आहेत. त्यामुळे यासोबतच काही लोक मांजरही पाळतात. तसेच अनेक असे पाळीव प्राणी आहेत ज्यांना लोक आपल्या घरी आणतात आणि आपल्या घराचा सदस्य बनवतात. आपण त्यांना इतका जीव लावतो की तेही अगदी आपल्यातलेच एक होऊन जातात. या प्राण्यांवर आपण जीवापाड प्रेमही करतो. या प्राण्यांना आपल्यासोबत झोपवण्यापासून ते त्यांना खायला घालणे, फिरायला नेणे अशा सगळ्या गोष्टी आपण अगदी आवडीने करतो. आता कुत्रा, मांजर किंवा अगदी एखादा पक्षी वगैरे ठिक आहे. पण एखाद्याने थेट वाघच पाळायचं ठरवलं तर?

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतं. हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे ज्यावर खूप प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होऊ शकतात. प्राण्यांचे सुद्धा अनेक व्हिडीओ यात असतात. आता हा व्हिडीओच बघा. विचार करा जर तुम्ही घरात एखादा वाघ पाळला तर? याहीपेक्षा असा विचार करा की तुम्ही पाळलेल्या वाघाने तुमच्यावरच हल्ला केला… धक्काच बसेल ना? पण पाकिस्तानमधील एका व्यक्तीने एका सिंहिणीला जेरबंद केले आहे. त्यानंतर त्यानं भल्या मोठ्या सिंहीणीसोबत असे कृत्य केले की हे पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

Bollywood Actors Salman Khan ex-girlfriend Somy Ali claimed that Sushant Singh Rajput was murdered
“सुशांत सिंह राजपूतची हत्याच केली”, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने केला दावा; म्हणाली, “एम्सच्या डॉक्टरांनी…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
hindus atacked in canada
हिंदू भाविकांवरील हल्ला कॅनडा प्रशासनाचं कारस्थान? व्हायरल Video मध्ये महिलेचा टाहो; म्हणाली, “हाच तो”!
vidya balan
“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”
hindu temple attacked in canada (1)
Video: “कॅनडात हिंदूंवर झालेला हा हल्ला म्हणजे…”, अमेरिकन संसदेतील मराठमोळे सदस्य श्री ठाणेदार यांचं परखड भाष्य!
man murdered colleague over dispute on food cooking
धक्कादायक! हॉर्न का वाजवता? विचारल्याने दोन बहि‍णींकडून माजी पोलीस अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न
pakistani celebrated diwali
Video : पाकिस्तानी सेलिब्रिटींनी ‘अशी’ साजरी केली दिवाळी, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

साधारणपणे सिंह किंवा सिंहिणी दिसल्यास आपण पळून जाऊ पण किंवा तिथून कुठल्यातरी सुरक्षित ठिकाणी जाऊ. तरीही जर वाघाच्या वाघीणीच्या तावडीत सापडलोच तर मग काही खर नाही. पण याच सिहिंणीने तुम्हाला मिठी मारली तर? विचारही करवत नाही ना. याठिकाणी असंच काहीसं घडलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाकिस्तानमधील एक व्यक्ती दिसत आहे. तो माणूस जाळी असलेल्या एका खोलीत जातो. तो तिथे उपस्थित असलेल्या सिंहिणीचा पुढचा पंजा त्याच्या खांद्यावर ठेवतो. आणि तिच्याशी खेळायला लागतो. काही वेळाने तो सिंहिणीला मिठी मारतो. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @miansaqib363 नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ६००० हून अधिक लोकांनी लाइक केला आहे. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘भाईची कोणतीही पोस्ट शेवटची असू शकते’, तर यूजरने लिहिले आहे की,’वन्य प्राण्यांचा बंदिस्त करणे खूप चुकीचे आहे’,